Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सशस्त्र दलांनी भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिजे : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली ः सशस्त्र दलांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे आणि आजच्या सतत विकसित होत असलेल्या बहु-क्षेत्रीय वातावरणात भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिज

ओबीसी संघटना आजपासून मैदानात
माथाडी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन प्रयत्नशील – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
मुलाच्या प्रेमप्रकरणातून वडीलास झालेल्या मारहाणीत मृत्यू

नवी दिल्ली ः सशस्त्र दलांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे आणि आजच्या सतत विकसित होत असलेल्या बहु-क्षेत्रीय वातावरणात भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, जेथे सायबर, अंतराळ आणि माहिती युद्ध देखील पारंपारिक कार्यप्रणाली इतकीच शक्तिशाली झाली आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील सशस्त्र दल तसेच मित्र देशांतील अधिकार्‍यांना 10 एप्रिल रोजी, तामिळनाडू येथील वेलींग्टन कॉलेजमधील, 80 व्या केंद्रीय सेवा (सेंट्रल सर्व्हिस) दीक्षांत समारंभात संबोधित करताना सांगितले.
आजचे जागतिक भू-राजकारण तीन प्रमुख मापदंडांद्वारे पुनर्परिभाषित केले जात आहे: राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दिशेने एक प्रमुख बिंदू, जागतिक वातावरणात वाढणार्‍या तांत्रिक त्सुनामीला तोंड देणे आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, असे संरक्षण मंत्री यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. धोरणात्मक-लष्करी बदलाच्या वळणावर पुढे राहण्यासाठी या बदलांच्या बारकाव्यांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी अधिकार्‍यांना केले. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सशस्त्र दलांना एका तांत्रिकदृष्ट्या-प्रगत चढाईसाठी सज्ज अशा दलात बदलण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान विविध मार्गांनी प्रतिकार करण्यात आणि युद्ध लढण्यात क्रांती घडवत आहेत, हे अधोरेखित करून राजनाथ सिंह यांनी, लढाईच्या क्षेत्रांमधील तांत्रिक नवकल्पनांची शक्ती चित्तथरारक असल्याचे सांगितले. युक्रेन-रशिया संघर्षात, परिवर्तनकारी विज्ञान नसले तरी ड्रोन हे एक नवीन साधन म्हणून उदयास आले आहे. सैनिक आणि उपकरणांचे बरेचसे नुकसान हे पारंपारिक तोफखाना किंवा चिलखत यामुळे झाले नसून ड्रोन त्याला कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे, लो-अर्थ ऑर्बिटमधील अंतराळ क्षमता लष्करी डावपेचांमध्ये बदल घडवून आणत आहे, संप्रेषण कौशल्ये आणि लक्ष्य प्राप्त करून घेत आहेत आणि लढायांना एका नवीन उच्च पातळीवर नेत आहेत, असे ते यावेळी म्हणाले. जग ग्रे झोन मध्ये आहे आणि हायब्रीड युद्धाच्या युगात आहे, जेथे सायबर-हल्ले, विपरीत माहिती (डिसइन्फॉर्मेशन) मोहिमा आणि आर्थिक युद्ध ही साधने बनली आहेत, जी एकही गोळी न चालवता राजकीय-लष्करी उद्दिष्टे साध्य करू शकतात, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. भारताला आपल्या सीमेवरील प्रदेशात सततच्या धोक्यांचा सामना करावा लागतो, जे त्याच्या शेजारी निर्माण होणार्‍या खोटे युद्ध (प्रॉक्सी वॉर) आणि दहशतवादाच्या आव्हानामुळे आणखी वाढले आहे, असे ते पुढे म्हणाले.


सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी कटिबद्ध
संरक्षण मंत्र्यांनी आत्मनिर्भरतेद्वारे सशस्त्र दलांच्या विकास आणि आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. एक सक्षम, स्वदेशी आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादन परिसंस्था तयार करणे हा पर्याय नाही, तर एक धोरणात्मक गरज आहे, हे सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे धडे आम्हाला शिकवतात. तसेच कमी खर्चिक, उच्च-तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले उपाय विकसित करण्याची आणि सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्याची गरज आहे. आपल्या सैन्याने केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल केले पाहिजेत असे नाही तर आपण त्यासाठी अग्रेसर रहायला हवे असे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS