Homeताज्या बातम्यादेश

तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्‍वर : भारताच्या डीआरडीओने विकसित केलेल्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची बुधवारी 12 मार्च रोजी ओडिशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.

डिजिटल अटकेपासून सावध व्हा : पंतप्रधान मोदी
Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.
शेतकऱ्यांना मालामाल होण्याची संधी… सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे लाखोंचे उत्पन्न… सरकारी योजना

भुवनेश्‍वर : भारताच्या डीआरडीओने विकसित केलेल्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची बुधवारी 12 मार्च रोजी ओडिशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. हवेतून हवेत मारा करणारी 7 क्षेपणास्त्र 100 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चाचणीत, अस्त्र क्षेपणास्त्राने हवेत उडणार्‍या लक्ष्यावर थेट मारा केला. सर्व प्रणालींनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्व मिशन पॅरामीटर्स पूर्ण केले. यावरून हे स्पष्ट झाले की हे क्षेपणास्त्र कोणत्याही परिस्थितीत शत्रूची विमाने पाडण्यास सक्षम आहे. ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र प्रगत मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणालींनी आहे. तसेच पायलटला न दिसणारे लक्ष्य देखील नष्ट करू शकते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अस्त्र क्षेपणास्त्र आधीच समाविष्ट आहे. आता ते तेजस एमके-1ए प्रकारासाठी देखील पूर्णपणे तयार आहे. या यशस्वी चाचणीनंतर, तेजसची मारक क्षमता आणखी वाढेल, ज्यामुळे भारताच्या हवाई शक्तीला नवीन बळ मिळेल.

COMMENTS