भारताने १९९१ मध्ये जरी जागतिकीकरणाचा स्वीकार केला; तरी, अमेरिका वीस वर्षे आधीच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जगावर लादत होती. त्यावेळी सगळेच म्हणत

भारताने १९९१ मध्ये जरी जागतिकीकरणाचा स्वीकार केला; तरी, अमेरिका वीस वर्षे आधीच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जगावर लादत होती. त्यावेळी सगळेच म्हणत होते की, भांडवली व्यवस्थेत उत्पादकांची किंवा बाजाराची एक स्पर्धा निर्माण होते. या, स्पर्धेतून किमतीची ही स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे प्रत्येक उत्पादक आपल्या वस्तूचा खप अधिक होण्यासाठी, तिचं उत्पादन मूल्य कमी करून, तिचा खर्च जेवढा कमी होईल तेवढा करत, तिची किंमत बाजारपेठेत कमी ठेवतो. हे बाजारपेठेच्या भांडवली स्पर्धेतील महत्त्वाचे पाऊल असते. मात्र, जागतिकीकरणाचा स्वीकार करूनही भारतामध्ये बाजारपेठ अशी स्पर्धात्मक झाली नाही. खासकरून आधुनिक इंटरनेट आणि मोबाईलच्या क्षेत्रामध्ये हे मार्केट स्वस्त होण्याऐवजी महागडी झाली. यात किंमत युद्ध होण्याऐवजी सरकारच्या जवळ जास्तीत जास्त जाऊन, आपल्या परीने या व्यवसायामध्ये प्रवेश करणाऱ्यांनी सरकारी कंपनी बीएसएनएलचं अस्तित्व संपवून आपली मक्तेदारी निर्माण केली. परंतु ही मक्तेदारी स्पर्धात्मकतेतून करता त्यांनी सरकारशी असलेल्या संबंधातून निर्माण केली! पण, त्याच जिओ ला आता भारतातील एअरटेल आणि अमेरिकेतील स्टारलिंक या एलान मस्क यांच्या कंपनीच्या समन्वयातून स्पर्धा उभी राहिली. अर्थात, या स्पर्धेतून जीओ संपून जाईल, अशी भाषा काही जण करायला लागले आहेत. परंतु, मोठ्या प्रमाणात स्थायी झालेल्या व्यवसायात असं संपवणे इतके सहज सोपे नसते. याउलट, भांडवलदार आणखी जागतिक पातळीवर आपला नवा साथीदार शोधून ही स्पर्धा तीव्र करू शकतो. परंतु, आता केवळ भांडवलदार यांच्यातील ही स्पर्धा राहिलेली नसून आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने, ही स्पर्धा आता ज्ञान या क्षेत्रावर अधिक अवलंबली आहे. भारतीय भांडवलदारांनी संशोधन करण्यावर कधीच लक्ष दिलं नाही. याउलट, भारतात संशोधन करण्याची प्रक्रिया सरकारी स्तरावरच होत राहिली आणि त्यातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानावर भांडवलदारांनी सरकारशी गठबंधन करीत आपली सोय केली. देशाच्या सार्वजनिक व्यवस्थेच्या संशोधनातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाच्या युगात आपली मक्तेदारी मिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुणवत्ता नसेल तर आधुनिक काळात कोणतीही मक्तेदारी टिकवता येत नाही, हे एअरटेल आणि एलन मस्क यांच्या स्टार लिंक यांच्या समन्वयातून जो उद्योग उभा राहतो आहे, त्यावरून जिओ सारख्या उद्योगाला एक सबक नक्की मिळेल. कारण, भांडवलदारांचा एक सोपा मार्ग असतो की, केवळ नफा कमवणे आणि ज्ञानाकडे दुर्लक्ष करणं. परंतु, एलन मस्क यांनी हे युग हे ज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर आधारलेले आहे, हे ओळखले. त्यामुळे, जगातला कोणताही देश जे साध्य करू शकला नाही, ते म्हणजे अमेरिकेतील यांनावर स्पेस मध्ये गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच यांना पृथ्वीवर परत आणण्याचं स्टार एयरबेस या प्रकल्पातून एलान मस्क यांनी साध्य केलं. त्यामुळे एलान मस्क यांच्या उद्योग व्यवसायातून जगातील भांडवलदारांनी एक शिकवण घ्यायला हवी की, ज्ञानावर आधारल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये अधिक उंची गाठता येणार नाही! हेच एअरटेल आणि स्टार लिंक यांच्या समन्वयाच प्रतिक आहे. शिक्षण, तंत्रज्ञान याकडे दुर्लक्ष करून केवळ नफा आणि नफ्याचा शोध घेणारी जिओ, आता ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अभावाने जागतिक स्पर्धेतच मागे पडली असं नव्हे, तर, त्यांचा उभा राहिलेला आणि भारतातून सर्वाधिक नफा कमवणारा जीओ हा उद्योग रसातळाला जाण्याचे संकेत आता देशातील आणि जगातील अनेक भांडवलदार देत आहेत. हीच जगातील कोणत्याही भांडवलदारांना मिळालेली योग्य शिकवण आहे, हाच त्याचा मतितार्थ आपल्याला घेता येईल!
COMMENTS