Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसमधील अटलबिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे केले उद्घाटन

पोर्ट लुईस/नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी लोक से

मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील
WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा |
Image

पोर्ट लुईस/नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत-मॉरिशस विकास भागीदारीअंतर्गत राबवण्यात आलेला हा ऐतिहासिक प्रकल्प, मॉरिशसमधील क्षमता विकासाप्रति असलेली भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो.

2017 च्या सामंजस्य करारानुसार 4.74 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या अनुदानाद्वारे उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक संस्था, मंत्रालये, सार्वजनिक कार्यालये, निम सरकारी संस्था आणि सरकारी उपक्रमांमधील मॉरिशसच्या नागरी सेवकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा पूर्ण करेल.प्रशिक्षणाव्यतिरिक्त, ही संस्था सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करेल, तसेच संशोधन, प्रशासन विषयक अभ्यास आणि भारताबरोबरच्या संस्थात्मक संबंधांना चालना देईल.

यावेळी पंतप्रधानांनी आयटीईसी आणि भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळालेल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्यांनी यापूर्वी भारतात प्रशिक्षण आणि शिक्षण घेतले आहे.क्षमता विकासाच्या या देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांच्या नागरिकांमधील दृढ संबंधांना बळकटी मिळाली आहे.

ग्लोबल साउथ प्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेला सुसंगत असलेली ही संस्था,हिंदी महासागर क्षेत्रातील विश्वासू भागीदार म्हणून भारताची भूमिका आणि भारत-मॉरिशस दरम्यानची व्यापक भागीदारी मजबूत करण्यासाठी असलेली अतूट वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

COMMENTS