Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी संघटना विधानभवनावर धडकली ; कांद्याचे 20 टक्के निर्यात शुल्क हटवा

मुंबई/देवळाली प्रवरा : स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, परभणी, नाशिक,आदी भागातील शेतकऱ्यांनी कांद्या

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
प्रत्येक गावात बजरंग दलाची शाखा स्थापन करणार-शंकर नाईनवाड
कोल्हापुरात पाणी पातळीत घट

मुंबई/देवळाली प्रवरा : स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, परभणी, नाशिक,आदी भागातील शेतकऱ्यांनी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्यासाठी विधानभवनावर अचानक धडक देवून घोषणाबाजी केल्याने   पोलिसांनी विधानभवनाच्या प्रवेद्वाराजवळ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडविल्याने विधानभवनाच्या रस्त्यावर कांदे, कापूस, तुर फेकून शासनाचा निषेध करीत कांदा, तुर, कापूस यांच्या दरात झालेली घसरण झाल्याने.महाराष्ट्र यावर्षी कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात असुन 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी करण्यात आली. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारा समोरील रस्त्यावर कांदे,तुर,कापूस फेकून निषेध केला. मुंबईच्या रस्त्यावर कांदा,तुर व कापूस फेकण्यात आले.यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

          स्वाभिमानीच्या या आंदोलनात राजू शेट्टी,विदर्भ प्रमुख दामू इंगोले, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे,परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,स्वाभीमानीचे युवा अध्यक्ष अमर कदम,नाशिकचे घारे पाटील,प्रकाश बालवडकर,राहुरीचे आनंद वने,धनंजय लहारे,प्रमोद पवार,सतिष पवार,सचिन म्हसे आदी सहभागी झाले होते.

COMMENTS