Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्याला पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे : थोरात

संगमनेर : बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रेच्या माध्यमातून बंधुता निर्माण करण्याचा काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याने अनेक

लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्यामध्ये राज्यात अव्वल
धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी
बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार

संगमनेर : बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रेच्या माध्यमातून बंधुता निर्माण करण्याचा काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याने अनेक मान्यवर घडवले मात्र आज या जिल्ह्यावर वाईट दिवस आले आहे. हा जिल्हा कधीही असा नव्हता त्यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
   महाराष्ट्र काँग्रेसच्या मस्साजोग मधून निघालेल्या सद्भावना पद यात्रेच्या भव्य सांगता मेळावा हा बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. समवेत व्यासपीठावर नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील ,खासदार हेमंत काळे ,माजी मंत्री अशोक पाटील ,न्यायमूर्ती वळसे पाटील ,आ. राजेश राठोड, संगमनेर युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात,राहुल सोनवणे ,ओम जोशी , कुणाल चौधरी यांसह मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले कि, सद्भावना पदयात्रेने, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ हा राहुल गांधी यांचा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहचवला आहे. बीड जिल्हा हा सद्भावना जोपसणारा आहे. बीड जिल्ह्याची आजची जी परिस्थिती आहे ती कधीच अशी नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा आहे. विठ्ठलाच्या वारीत जसा वारकरी एका ऊर्जेने चालतो तीच ऊर्चा या पदयात्रेत दिसली. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धताने करण्यात आली. राज्यघटना हे आपले तत्वज्ञान असेल तर तिथे समाजात भेदभावाला स्थान नाही. मानव धर्म हा खरा धर्म व विठ्ठल हा त्यांचा देव आहे. राज्यात पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीला व संविधानाला धोका हा तो वेळीच ओळखा असे आवाहन करून संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
         डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, बीडमध्ये संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला कालीमा फासणारी आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही सर्वजण वैभवी आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
      यावेळी निघालेल्या भव्य पद यात्रेत लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ.  जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेरचे पदाधिकारी ही सहभागी झाले होते

COMMENTS