Homeताज्या बातम्याशहरं

औषधनिर्मितीमध्ये तरुणांना संशोधनाची मोठी संधी : थोरात

संगमनेर : जगभरातील लोकसंख्येच्या तुलनेत भारतामध्ये मोठी लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या विविध आजारांवर प्रभावी औषधांची मोठी गरज असल्याने

नारायण टेक्नो नांदेड या शाळेस शासनाची मान्यता नाही
शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक
धुळे व दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात

संगमनेर : जगभरातील लोकसंख्येच्या तुलनेत भारतामध्ये मोठी लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या विविध आजारांवर प्रभावी औषधांची मोठी गरज असल्याने औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये युवकांना व विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन मा. शिक्षण व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये दोन दिवसीय ड्रग्स डिस्कवरी अँड डेव्हलपमेंट फ्रॉम कॉन्सेप्ट टू कमर्शियलायझेशन या विषयावर इंटरनॅशनल कॉन्फरन्स च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विश्वस्त मा.आ.डॉ सुधीर तांबे, सौ शरयू ताई देशमुख , इंडियन फार्माकोपिया कमिशन, व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ. व्ही  कलाईसेलवण, आयसीएमआरचे डॉ विकास दिघे, न्यू जर्सी अमेरिका येथील डॉ मनोज जाधव, डॉ आभा चाळपे – घोष, इंडोनेशिया येथील डॉक्टर मास्टरीया इनोविल्सा, थायलंड येथील इक्कासित कुमारनसीत, मलेशिया येथील डॉ. झूरीना बिनती हसन, डॉ नितीन माळी, डॉ सचिन जोशी, इशिता श्रीवास्तव, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे बी गुरव, प्रा. व्ही बी धुमाळ, प्राचार्य डॉ मनोज शिरभाते आदींसह सर्व विभागांचे प्राचार्य उपस्थित होते. या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये विविध देशांमधील 700 हुन अधिक विद्यार्थी व संशोधकांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी  माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाच्या साथीनंतर जगाला आरोग्याचे आणि औषधाचे महत्त्व जास्त समजले. वाढत्या लोकसंख्येबरोबर आजारांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर कायमस्वरूपी मात व्हावी याकरता प्रभावी औषधांची गरज ही औषधे स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारी निर्माण व्हावी ही महत्त्वाची आहे .कारण त्यातून आरोग्य सेवा घडत असते आणि म्हणून या क्षेत्रामध्ये संशोधनाबरोबर करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी संगमनेर मध्ये येऊन स्थानिक विद्यार्थ्यांची साधलेल्या संवादामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे ते म्हणाले. तर डॉ .सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेने आपले नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे.संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आरोग्य हे अत्यंत महत्त्वाची असून अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात मात्र आरोग्याला प्रत्येकाने प्राधान्य द्यावे याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या विविध औषधांसाठी अजूनही कुशल व तंत्रज्ञांची कमतरता आहे आणि म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून औषध निर्मिती संशोधनात नक्कीच लाभ होईल असे ते म्हणाले. याप्रसंगी पेपर प्रेझेंटेशन व कार्यशाळेतील सहभागाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ मनोज शिरभाते यांनी केले. यावेळी विविध विद्यापीठांमधील प्राध्यापक, देशात व विदेशातून आलेले विद्यार्थी,शिक्षक, संशोधक आदी उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील प्राचार्य, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम केले. या सर्वांचे लोकनेते बाळासाहेब थोरात मा. आमदार डॉ. सुधीर तांबे व विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS