Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्यांनी जीवन घडविले तेच माझ्या लेखनाचे आदर्श : डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर : माझे जीवन आणि साहित्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून माझ्या पोरक्या जीवनावर ज्यांनी कृपाछत्र धरले, ज्यांचे अनंत ऋण आहेत तेच माझ्या

पाणी पुरठ्यासाठी ग्रामपंचायत अभियंत्याच्या दालना समोर आमरण उपोषण
सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु
नदीत उतरलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

श्रीरामपूर : माझे जीवन आणि साहित्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून माझ्या पोरक्या जीवनावर ज्यांनी कृपाछत्र धरले, ज्यांचे अनंत ऋण आहेत तेच माझ्या जीवनाचे आणि साहित्याचे आदर्श आहेत, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी काढले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांची अभिजात मराठी भाषादिन आणि साहित्यिक मुलाखत प्रसंगी रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातील मराठी विभागातील विद्यार्थी शुक्लेश अनिल वाघमारे यांनी फिडवर्क संदर्भाने मुलाखत घेतली, त्याप्रसंगी डॉ. उपाध्ये बोलत होते. बोरावके महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शुक्लेश वाघमारे याने प्रोजेक्ट संदर्भाने साहित्यिक विषयक मुलाखत संदर्भाने अनेक प्रश्‍न विचारले. जन्म- बालपण, शिक्षण, नोकरी, साहित्य प्रेरणा, जीवनप्रेरणा मराठी अभिजात भाषा दर्जा आदी संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नास मनमोकळे उत्तर देताना , मराठी विभाग प्रमुख प्रोजेक्ट मार्गदर्शक प्रा.डॉ. बाळासाहेब शेळके यांचे विशेष कौतुक व धन्यवाद व्यक्त करीत डॉ. उपाध्ये म्हणाले, माझे जीवन अंधाराचा प्रवास असून मी सदैव प्रकाशाचा मार्ग शोधला. जे मूळ गाव ते मला फारसे माहीत नाही, जन्म कोठे ते आतापर्यंत पाहिले नव्हते, वडील आठवत नाहीत, मी7-8 वर्षाचा असताना आई गेली, गल्लोगल्ली भटकणार्‍या माझ्यासारख्या पोरक्या पोरास शाळेतल्या सौ. सुशीला शंकरराव देशमुख या बाईंनी शाळेचा रस्ता दाखवला. उंदीरगावातील भाऊसाहेब घोडे, छल्लाणी परिवार आदिंनी आधार दिला. पुढे राजूरचे किसनराव बोर्‍हाडे गुरुजी परिवार, हरेगावचे विनायकराव गलांडे पाटील, श्रीरामपुरात ड, गोविंदराव पेडणेकर, सोमाणी, झंवर परिवार. प्रा. एस्.सी. पाटील, सौ. मंगलताई पाटील आदिंच्यामुळे जीवन स्थिर झाले. प्रा. विजयराव कसबेकर, डॉ. वा.पु.गिंडे, डॉ. र.बा. मंचरकर आदीमुळे लेखनप्रेरणा मिळाली. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, फक्त आशीर्वाद अनेकांचे बरोबर असले पाहिजेत. चांगले वागले, बोलले की माणसे आपली होतात. कर्मवीर विचारांच्या रयत परिवाराने पोटाशी धरले म्हणून तेच माझे दैवत आणि आदर्श असल्याचे सांगून माझे लेखन वाचून शेकडो विद्यार्थ्यांना बंद केलेले शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली, हेच माझ्या लेखनाचे फलित व पुरस्कार असल्याचे सांगून मुलाखतीबद्दल आनंद व्यक्त केला. मंदाकिनी उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये, आरती उपाध्ये यांनी नियोजन केले. विद्यार्थी शुक्लेश वाघमारे यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS