Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

मुंबई, दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च, २०२५ रोजी दोन दि

पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे उद्या होणार उद्घाटन
महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषण घेतले माघार

मुंबई, दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च, २०२५ रोजी दोन दिवसांसाठी भारत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे परिषद आयोजित केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अध्यक्षतेखाली होणारी ही अशी पहिलीच परिषद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी अगदी प्रथमच या परिषदेकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांना नामनिर्देशित करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांना सूचित केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी हे वैधानिक प्राधिकारी म्हणून राज्य, जिल्हा व मतदार संघाकरीता महत्वाचे अधिकारी आहेत.

या दोन दिवसीय परिषदेतून राज्य तसेच केद्रशासीत प्रदेशांच्या अधिकाऱ्यांना विचारमंथन व परस्परांना आलेले अनुभव यातून शिक्षणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या दोन दिवसीय परीषदेच्या पहिल्या दिवशी आधुनिक निवडणूक व्यवस्थापनातील मुख्य क्षेत्रासह आयटी आर्किटेक्चर, प्रभावी संप्रेषण, सोशल मीडियाचा प्रसार वाढवणे आणि मतदान प्रक्रियेतील विविध अधिकाऱ्यांची वैधानिक भूमिका यासह प्रमुख मुद्यांवर चर्चा होईल. परीषदेच्या दुसऱ्‍या दिवशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी पहिल्या दिवशी झालेल्या मुद्देनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आपला संबंधित कृती आराखडा सादर करतील, असे भारत निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS