Homeताज्या बातम्यादेश

अंतराळ अर्थव्यवस्था 44 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल : मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी एका विशेष कार्यक्रमात भारताचे बायोफार्मा आणि अ

जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याने दरवाजा तोडून ठोकली धूम
‘त्या’ तीन महिलेचा खून करून जाळलं | DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी एका विशेष कार्यक्रमात भारताचे बायोफार्मा आणि अंतराळ क्षेत्र आणि शासन यामध्ये भारताची घोडदौड आणि हवामान उपाययोजना या विषयावर राज्यसभा सदस्य विजय तनखा यांच्यासोबत अतिशय सखोल चर्चेत महत्त्वाची माहिती दिली. डॉ. जितेंद्र सिंह यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कायापालटाला अधोरेखित केले आणि या सर्व सुधारणांचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले, ज्या सुधारणांमुळे हे क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर झाली असून पुढील दशकात 44 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे ते म्हणाले. संपूर्णपणे स्वदेशी गगनयान मोहीम, आगामी काळात होणारी चांद्रयान-4(2027), शुक्रयान(2028) आणि भारतीय अंतराळ स्थानक(2030) यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांचे टप्पे, भारताच्या भक्कम वाटचालीची कक्षा दर्शवत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्लीत संसद टीव्हीवरील एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पेडेक्ससारख्या अंतराळातील उपग्रहांच्या जोडणीची क्षमता प्रदान करणार्‍या, तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये मोठी झेप घेणार्‍या मोहिमांच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना दिल्याबद्दल त्यांनी स्टार्ट अप्स आणि एफडीआयची प्रशंसा केली. मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणजे व्योम मित्रा यंत्रमानव मोहीम असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.जितेंद्र सिंह यांनी बायोमॅन्युफॅक्चरिंग आणि बायो फाऊंड्रीज चौथ्या औद्योगिक क्रांतीला चालना देतील असा दावा केला. हिमालयापासून किनाऱपट्ट्यांपर्यंत पसरलेल्या विपुल साधनसंपत्तीमुळे भारताची जैव अर्थव्यवस्था विकासाला चालना देणारा कारक घटक समजला गेला आहे. समर्पित जैव-अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या काही देशांपैकी एक असलेला भारत या क्षेत्रातील पुनर्चक्रीकरण,उत्पादन आणि स्टार्टअप्समधील जागतिक नवोन्मेषांमध्ये नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. डॉ. सिंह यांनी नॉलेज पुलिंग, सार्वजनिक-खाजगी सहकार्य आणि स्टार्टअप सहभाग ते शाश्‍वत वृद्धी यांना सरकारच्या भक्कम पाठबऴाची पुष्टी केली. बायो-ई3 धोरण तयार करणारा भारत हा एक अग्रणी देश असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिक केंद्रित शासनाच्या दिशेने झालेल्या बदलाला अधोरेखित केले. मिशन कर्मयोगीसारखे उपक्रम भूमिका आधारित क्षमता उभारणीला प्राधान्य देऊन नोकरशाहीची नव्याने व्याख्या करत आहेत. चेहरा-ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्रासारखे नवोन्मेष आणि गतिशील ऑनलाईन मॉड्युल्समुळे नागरिकांचे जीवन सुकर झाले आहे. हवामान बदलाचा सामना करण्याची भारताची वचनबद्धता आणि विविध प्रकारच्या हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता यांचा पुनरुच्चार डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधानांच्या मिशन लाईफ या शाश्‍वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणार्‍या उपक्रमाकडे लक्ष वेधले. त्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्यनिगा क्षेत्रातील भारताचे नेतृत्व, आरोग्य आणि पर्यावरणीय समस्यांचे निवारण करताना जागतिक मानकांची पूर्तता यांना देखील अधोरेखित केले.
राष्ट्रपती भवनातील उद्यान 2 फेबु्रवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 2 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. वसंत ऋतूमध्ये हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते. एकूण 15 एकरांवर पसरलेल्या या प्रसिद्ध उद्यानात 85 हून अधिक प्रजातींची फुले आहेत. यात 100 हुन अधिक प्रकारचे गुलाब आणि 5 हजार हंगामी फुलांच्या 70 विविध प्रजाती आहेत. विविध प्रकारच्या ट्यूलिपसह जगभरातील रंगीबेरंगी फुलांची झाडे आहेत. फुलांव्यतिरिक्त 160 जातींची 5 हजार झाडे अमृत उद्यानात आहेत, यातील काही काही झाडे अनेक दशके जुनी आहेत.
राष्ट्रपती भवनात 6 ते 9 मार्च दरम्यान ’विविधता का अमृत महोत्सव’आयोजित केला जाणार आहे. या वर्षी अमृत महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवले जाणार आहे. दरवर्षी देशभरातील 5 ते 6 लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात. त्यानुसार अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. मात्र उद्यान 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे, 20 आणि 21 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात आयोजित एका परिषदेमुळे आणि 14 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने बंद राहील. अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट निशुल्क आरक्षित करता येतील. अमृत उद्यानाला भेट देणार्‍या सर्वांसाठी प्रवेश राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून होईल. अभ्यागतांच्या सोयीसाठी सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार क्रमांक 35 दरम्यान शटल बस सेवा दर 30 मिनिटांनी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाव्यतिरिक्त सर्वसामान्य लोक मंगळवार ते रविवार दरम्यान राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला देखील आधी तिकीट आरक्षित करून भेट देऊ शकतात.

COMMENTS