Homeताज्या बातम्यादेश

क्षेपणास्त्रसाठी संरक्षण मंत्रालयाचा 2 हजार 960 कोटींचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात

हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत
सर्वांसाठी ५जी सह कनेक्टीाव्हीसटीमध्ये नवीन सुधारणा! 

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे.
नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकार्‍यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. देशाच्या संरक्षण क्षमतांना बळकटी देण्यासाठी आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्याच्या चालू प्रयत्नांमध्ये हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. ’आत्मनिर्भर भारत’ वर भर देऊन, बीडीएलद्वारे ’बाय (इंडियन)’ श्रेणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्वदेशी सामग्री वापरून केलेली क्षेपणास्त्रे पुरवली जातील. या करारामुळे विविध एमएसएमईसह संरक्षण उद्योगात सुमारे 3.5 लाख श्रमदिन रोजगार निर्माण होईल.

COMMENTS