Homeताज्या बातम्यासंपादकीय

जिथे, जीभ लाकडाची बनते!

  काही वर्षांपूर्वी बीबीसी रेडिओच्या हिंदी आणि तामिळ विभागाचे प्रमुख म्हणून कैलाश बधवार कार्यरत होते. ते ' लंदन से पत्र ' नावाचं एक सदर बीबीसीच्य

सुशीलकुमारांची राजकीय कंडी !
बिहारमध्ये ओबीसी ‘सब पे भारी!’
सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचे काय ?

  काही वर्षांपूर्वी बीबीसी रेडिओच्या हिंदी आणि तामिळ विभागाचे प्रमुख म्हणून कैलाश बधवार कार्यरत होते. ते ‘ लंदन से पत्र ‘ नावाचं एक सदर बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय हिंदी अनुष्ठान वरून चालवायचे. त्यावेळी, त्यांचा श्रीलंका दौरा झाला होता.  त्या श्रीलंका दौऱ्याहून परतल्यानंतर त्यांनी बीबीसी वरून त्यांच्या नेहमीच्या ‘लंदन से पत्र’ या सदरातून श्रीलंकेचा अनुभव कथन केला होता. ज्यामध्ये त्यांना एक तरुणी पत्रकारने नुकताच पत्रकारिते प्रवेश केलेला होता; त्या तरुण पत्रकार  युवतीने त्यांना प्रश्न विचारला होता की, सर्वसामान्य  श्रीलंकन नागरिकांविषयी ब्रिटिश नागरिकांचा विचार काय आहे? त्यावर कैलाश बधवार यांचं म्हणणं होतं की, त्या तरुणीने विचारलेला प्रश्न, हा सर्वसामान्य होता; नेहमीचा होता! सर्वसाधारणपणे कोणत्याही देशात गेल्यानंतर, अशा प्रकारचा प्रश्न हा विचारला जातो. मात्र, त्या प्रश्नाच्या उत्तरात माझी बोलती अशी बंद झाली की,  माझी जीभ जणू लाकडाची बनली असावी. याचं कारण असं की, सर्वसामान्यपणे श्रीलंका विषयीच नव्हे तर, एकूण आशियायी देशांच्या संदर्भात, त्या काळात ब्रिटिश किंवा सगळ्या युरोपमध्ये भावना होती की, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रे जी आहेत ती, चोरी, खून, दरोडे, मारामाऱ्या अशा वेगळ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्यांनी भरलेले असायचे.  त्यामुळे या देशांविषयी युरोपियन देशांची विचार करण्याची पद्धत काहीशी विचित्र होती. मात्र, आजही जर आपण प्रसारमाध्यमांच स्वरूप पाहिलं तर, आपल्या भाषिक माध्यमांमध्ये नेहमीच अशा प्रकारच्या बातम्यांना पहिलं पान मिळतं की, ज्यावर कोणी काय गुन्हा केला, कोणाला काय शिक्षा झाली, कुणी काय गुन्हा केला, या प्रकारच्या बातम्यांनी आजही रकानेच्या रकाने भरलेले असतात. सांगायचे तात्पर्य असे की, सध्या महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे बीडच्या अवतीभवती गुंतून पडली आहेत. प्रसार माध्यमांचा एक नैतिक दबाव असावा, ज्यात व्यवस्थाच दबावात असावी.‌ मग, पोलीस, प्रशासन, सरकार आणि समाज ही नैतिक दबावाखाली असावा. परंतु, प्रसार माध्यमांनी धंदेवाईक होत, असला नैतिक दबाव आपण होवूनच संपवला आहे. त्यामुळे, गुन्हेगारी जगताभोवती आपल्या माध्यमांना ब्रेकिंग न्यूज दिसते. मुळातच, प्रसार माध्यमांनी आपल्या ध्येयधोरणांची गुणवत्ता वाढवली असती तर, राजकारणात आणि राजकीय लोकांच्या अवतीभवती गुन्हेगारी व्यक्तींचे वाढणे शक्य झाले नसते. लोकांच्या सेवेसाठी अथवा कल्याणासाठी राजकीय सत्ता उभी असते, असा एक नैतिक विचार असतो. परंतु, त्या नैतिक तत्वाचा पार पालापाचोळा झाला आहे. गेली दोन पेक्षा अधिक महिने बीड च्या भोवतीच माध्यमे फिरताहेत. खरेतर, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रसार माध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका निभावत अनेक सत्य बाहेर आणली पाहिजे. परंतु, तसं काही होताना दिसत नाही. बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून हा जितका भयावह तितकाच त्या प्रकरणानंतर दरदिवशी एक पैलू समोर आणत गुन्हेगारांना सतत चर्चेत ठेवण्याचा प्रकार, अधिक किळसवाणा आहे. ज्यामुळे, कोवळ्या शाळकरी मुलांनी कोणत्या प्रेरणा घ्याव्यात? असा प्रश्न निश्चितच उभा राहतो. प्रसिध्दीचा झोत चांगला असो की वाईट, तो एक मानसिक प्रेरणा निर्माण करतो.‌ अशा प्रेरणा कोवळ्या वयातील शाळकरी मुलांच्या मनात निश्चितपणे निर्माण होतात.‌ जे सामाजिक पातळीवर पुढे चालून धोक्याचे ठरू शकते. केवळ भारतीय पत्रकार म्हणूनच नव्हे, तर, जबाबदार नागरिक म्हणून देखील आम्ही या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

COMMENTS