मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घमासन उभे राहिले आहे. महाराष्ट्रात जवळपास सहा राजकीय प्रमुख पक्ष या निवडणुकी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घमासन उभे राहिले आहे. महाराष्ट्रात जवळपास सहा राजकीय प्रमुख पक्ष या निवडणुकीत आपली शक्ती आजमावणार आहेत. परंतु, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या कायम राहिल्या. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवून महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एक चुरशीचा रंग भरला. परंतु, लोकसभेमध्ये एक हाती महाविकास आघाडी यश मिळवून गेली तर, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाले. अशा वेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कारण युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे, जवळपास सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करू लागले आहे. त्यातच, आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी देखील स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची भाषा खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून केली आहे. याचा अर्थ, मुंबई महापालिकेत शिवसेनेने आपलं अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना शह देण्याची राजकीय खेळी ही करू पाहत आहेत; हे मात्र स्पष्ट दिसत आहे. अर्थात, महापालिकेच्या निवडणुकांच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष हा चिततट चा खेळ निश्चितपणे करेल. उध्दव शिवसेनेचे एकला चालो रे कितपत तग धरेल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अर्थात, या नव्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मोठ्या चुरशीच्या होतील. परंतु, निवडणूक लढविण्याची साधने ज्यांच्याकडे मुबलक आहेत, त्यांना यश गवसणे, हा अलीकडच्या राजकारणाचा होऊ पाहत असलेला स्थायीभाव याही निवडणूक पाहायला मिळेल; अशी शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकदा लागल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास २९ महानगरपालिका आणि अनेक जिल्हा परिषद यांच्या निवडणूक या टर्ममध्ये होतील. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेच्या राजकारणात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष महत्त्वाचा सहभाग घेतील हे मात्र नाकारता येणार नाही. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्षांची जी आघाडी आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्ता वाटपाचा समतोल साधण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता केंद्रांमध्ये काही कार्यकर्त्यांना सोय करून दिली जाईल. यासाठी सत्ताधारी महायुतीच्या दृष्टीनेही या निवडणुका महत्वाच्या आहेत. तर तुटण्याच्या कगारावर आलेल्या महाविकास आघाडी संबंधी सध्या मात्र या निवडणुका अत्यंत जिकिरीच्या ठरतील. कारण, आधीच महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांपासून एक निराशेचे वातावरण आहे. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडीला भाजप चितपट करूनच राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसं तर ते प्रत्यक्षात घडत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची भाषा केली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करूनच उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
COMMENTS