Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोरेसच्या कार्यालयात आढळली 5 ते 6 कोटींची रोकड

मुंबई : शहरात सहा ठिकाणी ज्वेलर्स शोरूम टाकत त्यातून विविध गुंतवणूकीच्या ऑफर्स देत तब्बल सव्वा लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार टोरेस घ

खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाबाबत संशय ; पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी
शिवसेनेन हिंदुत्त्वाचा मुद्दा कधी सोडला नाही | LOKNews24
पक्ष आणि धनुष्यबाणावरच शिंदे गटाचा दावा ?

मुंबई : शहरात सहा ठिकाणी ज्वेलर्स शोरूम टाकत त्यातून विविध गुंतवणूकीच्या ऑफर्स देत तब्बल सव्वा लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार टोरेस घोटाळ्यात समोर आला आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला असून, तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. टोरेसच्या दादर कार्यालयात कोट्यावधींची रोख रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर ईओडब्ल्यूचे पथक गुरूवारी दादरमध्ये दाखल झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दादरच्या कार्यालयाचा पंचनामा केला जात आहे.
आतापर्यंत ईओडब्ल्यूने टोरेसच्या दादरच्या कार्यालयाची तीन खाती जप्त केली आहेत. या खात्यात जवळपास 11 कोटी रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे. दादरच्या टोरेस कार्यालयातील लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख अजूनही असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दादर च्या टोरेस कंपनीचा पंचनामा करण्यासाठी ईओडब्ल्यूने (आर्थिक गुन्हे) शाखेचे पोलिस दादर कार्यालयात दाखल झाले आहेत. टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांकडून दादरच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांकडून गर्दी केली जात आहे. त्यामुळे दादरच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकीकडे ईओडब्ल्यूने दादरच्या टोरेस येथी कार्यालयाची तीन बँक खाती जप्त केली आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार जवळपास 1500 लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या संख्येमध्ये वाढ देखील होऊ शकते.

COMMENTS