Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अय्यप्पा मंदिरातील ६० दिवसांच्या उत्सवाची सांगता १४ जानेवारीला मकर वीलक्कु उत्सवाने होणार 

अहिल्यानगर : नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात चालू असेलेल्या ६० दिवसांच्या मंडल,मकर पूजा उत्सवाची सांगता मंगळवार दि १४ जाने ला मकर वीलक्कु उत्सवाने होणार असून या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली.

 कर्जतमध्ये श्री संत गोदड महाराज जन्मोत्सव उत्साहात
ऊसतोड मजुरांच्या धान्य चोरी प्रकरणी पती-पत्नीसह तिघे ताब्यात
अवकाळी पावसाने राहुरी तालुक्यातील 14 गावे बाधित

अहिल्यानगर : नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात चालू असेलेल्या ६० दिवसांच्या मंडल,मकर पूजा उत्सवाची सांगता मंगळवार दि १४ जाने ला मकर वीलक्कु उत्सवाने होणार असून या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली.

दक्षिण भारतीयासह महाराष्ट्रातील भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळ मधील शबरीमळा येथे असून त्या मुख्य उत्सवाचा धर्तीवर नगरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो उत्सावा निम्मित पहाटे महागणपती हवन,संध्या ६ वा श्रमिकनगर मधील बालाजी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडीतून भव्य शोभायात्रा(तालापोल्ली)काढण्यात येणार आहे.ही तालापोल्ली पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात तर मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात येतो संध्या ७ वा दीपआराधना करण्यात येते.नगर मधील सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिरामध्ये १६ नोव्हेबर पासून ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सव प्रारंभ झाला होता त्यानिमित्ताने रोज धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे ,उत्सावा निम्मित ६०दिवस दररोज पूजा पुढीलप्रमाणे होत आहे आहे.पहाटे ५.३० वा पल्लीयुनथरल नंतर निर्मल दर्शन, सकाळी ६ वा अभिषेक, गणपती होम,स ७ व प्रसन्न पूजा तर नंतर स १० वाजेपर्यंत अर्चना,निरांजन व विविध पूजा तसेच संध्या५. ३०वा अलंकार दर्शन,नंतर दीप आराधना,महाआरती,पुष्पाभिषेक,रात्री ८वा अथर्व पूजा व नंतर दर्शन,अर्चना,निरांजन आणि भजन व हरीवरासम नंतर महाप्रसाद होत आहे तर विशिष्ट दिवशी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले तर २७ डिसेंबरला मंडलपूजा झाली,अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या दोन महिन्याचा उत्सवात भाविकांनी मोठ्या संखेने सहभागी झालेले आहेत. 

         शेवटी  देवाची आरती नंतर पुष्पभिषेक करण्यात येणार असून .नंतर भाविकांना  महाप्रसाद(गोड जेवण)देण्यात येणार आहे यावेळी हजारो भाविक उपस्थित राहणार आहे. शेवटी हरी वरासम होऊन ६० दिवसांच्या मंडल,मकर पूजा उत्सवाची सांगता होणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन अय्यप्पा सेवा सेमितीने केले आहे 

COMMENTS