Homeताज्या बातम्यादेश

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नडेला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. भारताम

पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार  हा शिक्षकच झाला आहे – रवींद्र चव्हाण
सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे
आजचे राशीचक्र रविवार, २४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. भारतामध्‍ये मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वाकांक्षी विस्ताराबद्दल आणि गुंतवणुकीच्या योजनांविषयी ऐकून पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.या बैठकीत तंत्रज्ञान,नवोन्मेषी कल्पना आणि एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध पैलूंवर दोघांनी चर्चा केली. या बैठकीबाबत सत्या नडेला यांच्या ‘एक्स’ वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले; “तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला, @satyanadella! मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊन आनंद झाला. आमच्या बैठकीत तंत्रज्ञान , नवोन्‍मेषी कल्‍पना आणि एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध पैलूंवर छान चर्चा देखील झाली.”

COMMENTS