Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एचएमपीव्हीने बाधित आढळले तीन रूग्ण

नवी दिल्ली :चीनमध्ये कोरोनासदृश्य विषाणू एमएमपीव्हीने धुमाकूळ घातला आहे. या साथीच्या आजाराचे रूग्ण सर्वाधिक आढळून येत असल्यामुळे चिंता व्यक्त करण

हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन
आलियाची चप्पल उचलाताना रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शहरातील मध्यवर्ती भागात मद्य परवाना देवू नका

नवी दिल्ली :चीनमध्ये कोरोनासदृश्य विषाणू एमएमपीव्हीने धुमाकूळ घातला आहे. या साथीच्या आजाराचे रूग्ण सर्वाधिक आढळून येत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असतांनाच सोमवारी भारतात देखील या विषाणूने बाधित रूग्ण कर्नाटकातील बंगळुरात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी देशात तीन रूग्ण आढळून आले आहे. कर्नाटकात दोन तर गुजरातमध्ये दोन रूग्ण आढळून आले आहे.
बंगळुरू शहराच्या उत्तर भागातील बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये हे प्रकरण निदर्शनास आले. मात्र, यानंतर काही तासांमध्ये दुसरा रुग्णसुद्धा बेंगळूरमध्ये आढळून आला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये अवघ्या दोन महिन्याच्या बाळाला पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कर्नाटकात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचे दोन प्रकरणे शोधून काढली आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे. चीनमध्ये एमएमपीव्हीची सर्वाधिक रूग्ण आढळून येत असल्यामुळे तिथे आणीबाणीसारखी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र तरीही चीन सरकारकडून सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र चीनमधून येणारे दृश्य अस्वस्थ करणारी आहेत. बेंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचपीव्हीची लागण झाली आहे, तिची लक्षणे त्याच दिशेने दर्शवत आहेत, अहवालातही व्हायरसची पुष्टी झाली आहे. ही चाचणी एका खासगी रुग्णालयाने केली होती ज्यामध्ये मुलगी कचझत विषाणू पॉझिटिव्ह आढळली. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचे आहेत. चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने 4 जानेवारी रोजी संयुक्त देखरेख गटाची बैठक घेतली. बैठकीनंतर सरकारने म्हटले होते की फ्लूचा हंगाम लक्षात घेता चीनची स्थिती असामान्य नाही.

COMMENTS