Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्मळ परिवाराने भक्तीचा आदर्श निर्माण केला :डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर : भक्ती आणि नीती समाजजीवनात सदैव निर्माण होणे गरजेचे असून निर्मळ परिवाराने श्रीमदभागवत कथेच्या माध्यमातून भक्ती आणि सेवेचा आदर्श निर्म

मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी येणार वेग
खंडाळा येथे आज कविसंमेलन
प्रा. सोनाली हरदास-जेजुरकर यांना पीएच.डी. प्रदान

श्रीरामपूर : भक्ती आणि नीती समाजजीवनात सदैव निर्माण होणे गरजेचे असून निर्मळ परिवाराने श्रीमदभागवत कथेच्या माध्यमातून भक्ती आणि सेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. श्रीरामपूरजवळील इंदिरानगर भागातील शिवकृपानगर येथील निर्मळ परिवाराने 21 ते 27 डिसेंबर या सप्ताहभर आयोजित श्रीमद भागवतकथा ज्ञानयज्ञ विविध उपक्रमांनी संपन्न केला, याप्रसंगी समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.
माजी गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे-पुरनाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,निर्मळ परिवाराने पंचक्रोशित गेल्या तीन वर्षापासून अशा धर्मकार्याचा आदर्श निर्माण केला असून कलावतीताई आणि श्री चंद्रभान निर्मळ, त्यांच्या परिवाराने भागवत कथा प्रवचन आणि उपक्रमातून नीतीसंपन्न वातावरण निर्माण केले आहे अशा सत्कार्याचा आदर्श निर्माण व्हावा असे त्यांनी आवाहन केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी पुढे सांगितले की, आजच्या तंत्रज्ञानी युगात कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, संस्कार रुजणे गरजेचे असून निर्मळ परिवाराने निर्मळ भक्ती भावनेने श्रीमद भागवतकथा प्रवचन पर्वाचे सुंदर आयोजन केले, ते मौलिक स्वरूपाचे असल्याचे सांगून देवमाणसेच कल्याणकारी कार्य करतात, त्यामुळेच समाज नीतीशील, गतिशील असल्याचे सांगितले. गेल्या सप्ताहभर भागवताचार्य ह.भ.प. पुरुषोत्तम कोळपकर महाराज आणि श्रीमद भागवत रहस्य ग्रंथाचे अनुवादक लेखक माजी मुख्याध्यापक ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद भागवतकथा प्रसंगाचे प्रवचनरूपी सादरीकरण केले. या धर्मकथेचे आयोजन चंद्रभान तान्हाजी निर्मळ, कलावती चंद्रभान निर्मळ, कैलास चंद्रभान निर्मळ, विकास चंद्रभान निर्मळ, मोहिनी विलास निर्मळ, वैष्णवी कैलास निर्मळ, वेदिका विकास निर्मळ, प्रथमेश विलास निर्मळ, विश्‍वजित विकास निर्मळ, ओमराज कैलास निर्मळ, आर्यवीर कैलास निर्मळ, दुर्गुश्‍वरी विलास निर्मळ इत्यादींनी सुंदर पद्धतीने केले, त्याबद्दल अनेकांनी कौतुक केले. यावेळी निळकंठ तरकासे महाराज, रामकिसन देवरे महाराज यांनी विविध भक्तीगीते सादर केली. माजी बीडीओ श्यामराव पुरनाळे,प्रा. एकनाथ औटी, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, शशिकांत दहिफळे, सुभाष वाघुंडे, कल्पनाताई वाघुंडे, श्यामराव नवले, सुमनताई मुठे,भीमराज चाफे, भाऊसाहेब पालवे, दत्तात्रय जायभाये, भीमनाथ कटारे, आदित्य गुळवे, सीताबाई वैजनाथ येवले, अर्जुन नवथर, दीपक शेटे आदी सह सर्वांचा निर्मळ परिवाराने सत्कार केले. प्रारंभी ग्रंथपूजन, संतपूजन करण्यात आले. आरती, भजने झाल्यावर कलावती निर्मळ यांनी आपले अनुभव सांगितले. निळकंठ तरकासे महाराज, पुरुषोत्तम कोळपकर महाराज, भागवतराव मुठे पाटील महाराज, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सुलोचनाताई पटारे- पुरनाळेसह अनेकांनी खूपच सहकार्य केल्यामुळे हे धर्मकार्य संपन्न झाले, निर्मळ परिवार आणि इंदिरानगर ग्रामस्थांनी योगदान दिले. विशेषतः महंत अरुणनाथगिरी महाराजांनी प्रवचनरूपी सेवा दिली, त्यामुळे आम्ही धन्य झालो, असे गौरवोद्गार व्यक्त करीत आभार मानले.

COMMENTS