Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात वैचारिक दारिद्रय वाढत चाललंय : माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत

पुणे : महाराष्ट्र सध्या वेगळ्याच वळणावर असून, मतांचे धु्रवीकरण करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला तिलांजली दिली जात आहे.

यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती
जादा आलेले पाच लाख रुपये परत केल्याबद्दल दांम्पत्याचा सत्कार
अमेरिकन न्यायालयातील असामाजिकता ! 

पुणे : महाराष्ट्र सध्या वेगळ्याच वळणावर असून, मतांचे धु्रवीकरण करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला तिलांजली दिली जात आहे. महाराष्ट्रात सध्या वैचारिक दारिद्र वाढत असून ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी चिंताजनक असल्याचे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि भोळे व सुमंत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

COMMENTS