Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाताळ-नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण

मुंबई :नववर्षांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. त्यासोबत बुधवारपासून नाताळचा उत्साह सुरू होत आहे. त्यामुळे नाताळचा उत्साह आणि नववर्

राजधानीतील 40 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी
ग्रामपंचायतीचे मतदान जवळ येत असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीला वेग  
Christmas: नाताळ विषयी माहिती

मुंबई :नववर्षांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. त्यासोबत बुधवारपासून नाताळचा उत्साह सुरू होत आहे. त्यामुळे नाताळचा उत्साह आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण असून, झगमगाट, रोषणाई असा माहोल सध्या देशभरात दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी सजावटही करण्यात आली आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी विशेषतः 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत लागू असेल. इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी 10 डिसेंबर 2024 रोजी शासनाला या संदर्भात विनंती केली होती. या मागणीचा विचार करून शासनाने नाताळ आणि नववर्षाच्या विशेष प्रसंगी लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी ही सवलत मंजूर केली आहे.

COMMENTS