Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे देणार : मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

पुणे : शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे

वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल
सरकारने रूफटॉप कार्यक्रमास 2026 पर्यंत मुदतवाढ
छत्रपतींनी हाती मशाल घ्यावी ः संजय राऊत

पुणे : शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचे पक्क घर असले पाहिजे, त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी केली.
किसान सन्मान दिवसानिमित्त पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चौहान पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्राचा जावई आहे. देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना 23 हजार कोटीचे बजेट होते ते आता 1 लाख 27 हजार करोड आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसर्‍यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी 6 लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. आता महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार असल्याची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

COMMENTS