Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोर्‍यात आणू : जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा विश्‍वास

अहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स

पुण्यात होणार 5 हजार कोटींची गुंतवणूक
काँगे्रसचा हिंदूंचे विभाजन करण्याचा डाव ;पंतप्रधान मोदींची टीका
लाठीहल्ल्याप्रकरणी सरकारची माफी

अहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात आणण्याचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना.विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ.विखे पाटील फाउंडेशन येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी केलेल्या सत्काराचाही स्विकार केला. आ.शिवाजीराव कर्डीले, आ.काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मा.आ.अरुणकाका जगताप, नाशिक विभागाचे आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदिंनी त्यांचे स्वागत केले. माध्यमांशी बोलताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्य मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्याची एक संधी असून, विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या जबाबदारीतून स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्‍चितपणे यशस्वी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळविण्यासाठी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता. त्याचेच आता धोरणात रुपांतर झाले. विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण करणाचे ध्येय ठेवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याने गोदावरीच्या तुटीच्या खो-यात पाणी वळविण्याचे एैतिहासिक काम भविष्यात पुर्ण करण्यासाठी आता वाटचाल असेल. कृष्णा खो-यातील पाणी प्रश्‍नाबाबतही निश्‍चित असे धोरण घ्यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्‍न, पाण्याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्याच्या वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
बीड आणि परभणी येथील घटनेबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या दोन्हीही घटनांबाबत मुख्यमंत्र्यांनी नागपुर आधिवेशनामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या दोन्हीही घटना अतिशय दुर्दैवी असून, दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. घटनेबाबत आता चौकशी समितीही नेमण्यात आली असून, या घटनेचे आता राजकारण करु नये. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येवून जातील परंतू त्यानंतर निर्माण होणारा सामाजिक तणाव तसेच जातीजातींमध्ये उमटणारे पडसाद याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.

COMMENTS