Homeताज्या बातम्यासंपादकीय

संघटक नसलेल्या राजकीय नेत्यांची गोची..!

  मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कालपासून ज्या जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही; त्यांचे नाराजी नाट्य मात्र सुरू झाले आहे. या

श्रीगोंदा तालुक्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध ः मंत्री विखे
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं परळीत आयोजन – खासदार प्रीतम मुंडे 
बीड जिल्ह्यातील उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बैठक घेणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

  मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कालपासून ज्या जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही; त्यांचे नाराजी नाट्य मात्र सुरू झाले आहे. या नाराजी नाट्यामध्ये प्रामुख्याने चर्चा आहे, ती म्हणजे छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात. छगन भुजबळ यांनी तर जवळपास राग व्यक्त केला आहे आणि राज्यसभेत जाण्याचं नाकारलेले आहे. परंतु, या दरम्यान त्यांना कुठल्यातरी राज्याचे राज्यपाल पदावर नियुक्ती देऊन शांत करण्यात येईल, असं बोललं जात आहे. परंतु, ते तितकसं सोपं नाहीये. कारण, राज्यपालांच्या नियुक्तीचा भाग हा केंद्रीय राजकारणातून ठरतो. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीला नरमाईचे धोरण  घेतलं; परंतु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाल्यानंतर, मात्र, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे जवळपास स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सुधीर भाऊंशी सविस्तर चर्चा झाली आहे. परंतु, केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी, अशी कोणतीही प्रदीर्घ चर्चा झाली नसल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभे केले. अर्थात, मंत्रिमंडळाच्या गठनानंतर अशा प्रकारच्या रागाने येणाऱ्या प्रतिक्रिया या काही काळ स्वाभाविक असतात. परंतु, मुत्सद्दी देवेंद्र फडणवीस असून  लटका विरोध ते सहजपणे मोडून काढतील, यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते विधिमंडळाच्या अधिवेशनात संपूर्ण मंत्रिमंडळासह सामील झाले. त्यांच्या मंत्रिमंडळ गठनाची कृती, नव्या चेहऱ्यांना जशी संधी देणारी आहे, तसे मंत्रिमंडळातील आक्रमक चेहरेच त्यांनी पुढे आणलेले दिसत आहेत. साधारणपणे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून त्यांनी जी नावे मागवलेली दिसतात; त्यामध्ये, साधारणत: सामाजिक आणि राजकीय पातळीवर आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना मंत्रिमंडळात प्राधान्य देऊन त्यांनी घेतल्याचे दिसते. अर्थात भुजबळ हे मराठा-ओबीसी आंदोलनाच्या दृष्टीने आक्रमक नेते म्हणूनच ते पुढे आले होते. त्यांची मूळ जडण-घडण आक्रमक असणाऱ्या शिवसेनेतूनच असल्यामुळे, त्यांचं व्यक्तिमत्व हे आक्रमक आहे; परंतु, सामाजिक सामंजस्याच्या दृष्टीने ही ते बऱ्याच वेळा पुढे येतात. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे ते कालांतराने मुख्यमंत्री पदाचा चेहरा होतील, अशी जी चर्चा केली जाते; तत्थ्य नाही. अर्थात देवेंद्र फडणवीस हे केवळ मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर भाजपाचे राजकीय नेते म्हणून देखील ते मुत्सद्दी आहेत. महाराष्ट्रात अनेक मोठ्या नावांना त्यांनी साईट ट्रॅक देखील केलेले आहे. यामध्ये एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे, विनोद तावडे असतील, अशा अनेक नावांना त्यांनी राजकीयदृष्ट्या आपला प्रतिस्पर्धी म्हणून बाजूला केलेले आहे. या तिघांच्या तोडीचे मुनगंटीवार यांना समजता येत नाही. कारण, मुनगंटीवार हे कधीही संघटक नेते राहिलेले नाहीत किंवा ते मास लीडर राहिलेलं नाही. राजकारणामध्ये सगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांची गरज असली तरी, मास लीडर असणाऱ्या नेत्यांचा वरचष्मा हा पक्षामध्ये नेहमी असतो. तो सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तितकासा नाही. तरीही, मंत्रिमंडळातील स्थानावरून नाराजी असणं आणि त्यातून आक्रमकता येणं किंवा निराशेतून काही आक्रमक शब्द येणे, हे समजू शकतो; परंतु, राजकीय नेता जर संघटक नेतृत्व म्हणून पुढे आलेले आलेला नसेल, तर, निश्चितपणे राजकारणात काही काळानंतर त्यांची गोची होते. अर्थात, इतरही पक्षांच्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले आहे. परंतु भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्या इतका अन्य कोणत्याही मंत्र्यांनी थयथयाट केलेला नसल्यामुळे, तो आपल्यासमोर फारसा स्पष्ट होत नाही किंवा चर्चेत येत नाही. मुनगंटीवार यांनी तर, तत्त्वज्ञाच्या थाटात सांगितले आहे की, सत्ता आज आहे उद्या नाही, उद्या नाही तर ती परवा येईल, अशा प्रकारे नित्य आणि अनित्याचा खेळ असा ऊन सावलीसारखा सुरु असतो, असं त्यांना सुचित करायचं असावं !

COMMENTS