Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणी घटनेची अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

परभणी : परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण ल

नांदायाला येत नसल्याने पतीने पत्नीच्या गळ्यावर मारले ब्लेड |
निळवंडे उपकालव्यांचे काम सुरू करून बंधारे भरून द्या
महाभारत ते एकविसावे शतकाचे चक्रव्यूह !

परभणी : परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, परभणीच्या घटनेची आता महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
अनुसूचित जाती – जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना त्या संदर्भात पत्र पाठविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. परभणीत सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी ठोस पावलं उचलण्याच्या ही सूचना त्यांनी केल्या आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती- जमाती आयोग लवकरंच परभणीचा दौरा करणार आहे.

COMMENTS