Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनुमान मूर्ती विटंबना घटनेच्या निषेधार्थ पुणतांब्यात पाळला बंद

पुणतांबा :हनुमान मूर्ती विटंबना घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणतांबाबंची हाक देण्यात आली होती दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी

नेवाशातील वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद
प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप | LOK News 24
संजीवनीच्या 12 अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

पुणतांबा :हनुमान मूर्ती विटंबना घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणतांबाबंची हाक देण्यात आली होती दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून बदला पाठिंबा दिला.
शुक्रवारी पहाटे रेल्वे स्टेशन समोरील हनुमान मूर्ती ची विटंबना झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते ग्रामस्थ सकल हिंदू समाज मंदिराजवळ एकत्र येऊन झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला होता रेल्वे पोलीस व जिल्हा पोलीस उपाधीक्षक शैलेश वमने यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांच्या सहकार्याने विटंबना करणारा आरोपी पोलिसांनी पकडला त्यानंतर गावातील तणाव निवळला होता. झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणतांबा बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन बंदा पाठिंबा दिला. यावेळी पत्रकार चौकात निषेध सभा घेऊन पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी गावात अनेक मंदिरात जुगार पत्त्याचे डाव अवैध धंदे सुरू असून त्याचा बंदोबस्त करावा कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिसांकडे केली यावेळी रात्रीचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी याचा बंदोबस्त केला जाईल अशी आश्वासन ग्रामस्थांना दिले

COMMENTS