मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी 16 डिसेंबरपासून सुरूवात होणार असल्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याम
मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी 16 डिसेंबरपासून सुरूवात होणार असल्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी वेग घेतला असून, शनिवारी मुंबईत राजभवनात शपथविधी होण्याचे प्रस्तावित होते. मात्र अधिवेशनामुळे सर्वच आमदार नागपुरात असल्यामुळे हा शपथविधी रविवारी नागपुरातच करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाही.
महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 12 आणि भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती. पण आता शनिवार ऐवजी रविवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. नागपुरात त्याची तयारी सुरू आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यामध्ये 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री असणार आहेत. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिघांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून खालील मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून गृहखाते आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही असणार्या शिवसेनेला आता नगरविकास खाते देण्यास भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदेंना मिळणार नगरविकास खाते ?
उपमुख्यमंत्रीपद दिले तर गृहमंत्रीपद देखील द्या अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली होती. मात्र गृहमंत्रीपद देण्यास भाजपने ठाम नकार दिल्यामुळे शिंदे काही दिवस नाराज असल्याचे समोर आले होते. मात्र शिंदे यांना गृहखात्याऐवजी नगरविकास खाते मिळणार असल्याचे समोर आले आहे. तर शिंदे यांच्या तीन मंत्र्यांचे पत्ते कट होणार आहे. यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे.
COMMENTS