Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अवकाशात 13 आणि 14 डिसेंबरला उल्का वर्षाव

मुंबई : आगामी 13 व 14 डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात. हा लघुग्रह व 3200 फ

देशभरात 70 लाख सिमकार्ड केले ब्लॉक
राज्यातील 100 सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे 9.28 कोटी थकित; थकबाकी कृषीपंप साखर पट्ट्यातील
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे

मुंबई : आगामी 13 व 14 डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात. हा लघुग्रह व 3200 फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे तयार होतो. ही वस्तू धुमकेतू व लघुग्रह यामधली एक मानली जाते. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी व अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. अंधार्‍या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असताना क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपण पाहतो. या घटनेस ‘तारा तुटला’ असे म्हटले जाते; परंतु तारा कधीही तुटत नाही. ही एक खगोलीय घटना आहे व यालाच ‘उल्का वर्षाव’ म्हणतात.

COMMENTS