Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी ही अफवा :आदिती तटकरे यांचा दावा

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असून, ज्यांच्याकडे चार चाकी गाडी, तसेच ज्यांचे उत्पन्न अडीच ल

धोकादायक पाण्याच्या टाकी बाबत आरोप प्रत्यारोप ! ग्रामस्थ संभ्रमित ! प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक .
Rajesh Tope : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? | LOKNews24
नीती, गती आणि व्यवहार ! 

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असून, ज्यांच्याकडे चार चाकी गाडी, तसेच ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशांची नावे वगळणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचा दावा माजी मंत्री, आमदार आदिती तटकरे यांनी केला आहे.
यासंदर्भात अधिक बोलतांना तटकरे म्हणाल्या की, मी या खात्याची मंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय झाला नाही. तशा काही तक्रारी आल्या तर सरकार पुढील निर्णय घेईल. पण अद्याप तशा तक्रारी दाखल झालेल्या नसल्याचा दावा देखील तटकरे यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जात आहे. मात्र यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहिण योजनेचा जीआर काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले गेले होते. त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे.

COMMENTS