Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रिपदासाठी इच्छूकांची घालमेल ; वर्णी लावण्यासाठी अनेकांची धडपड

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून तब्बल अकरा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी शपथविधी झालेला नाही. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत

नगरमध्ये रंगणार राजकीय शिमगा… भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना
बांगलादेशमध्ये सरन्यायाधीशांचा राजीनामा
शेवटी निकालापर्यंत पोहचलो !
मंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांचे गुडघ्याला बाशिंग; इच्छुकांच्या वरिष्ठ  नेत्यांशी भेटीगाठी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून तब्बल अकरा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी शपथविधी झालेला नाही. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसांपासून कुणाचीही भेट घेतली नाही. त्यातच शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, त्यामुळे महायुतीची बैठक होणे अपेक्षित असतांना ती अजूनही झालेली नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छूक असणार्‍यांची घालमेल वाढतांना दिसून येत आहे.
शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र शेवटपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होत त्यांनी अनेक मंत्रिपदे मिळवली तरी, शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेकांना मंत्रिपदे मिळालीच नाही. त्यामुळे आतातरी नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे मिळतील अशी आस लावून अनेक मंत्री गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी, मुख्यमंत्री कुणाचीही भेट घेण्यास तयार नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतांना दिसून येत आहे. मंत्रिपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत. दोन-तीन दिवस आपल्या मुळगावी दरे येथे गेलेले शिंदे हे रविवारी ठाण्यातील निवासस्थानी परतले. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारली नसल्याची माहिती आहे, त्यांना ताप, सर्दी, घशाला संसर्ग झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर शिंदे भेटी टाळत असल्याच्या चर्चांसोबत ते नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र शिंदे यांनी मंगळवारी सायंकाही वर्षा बंगल्यावर हजेरी लावल्यामुळे चर्चांना वेग आला आहे. राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी भाजप श्रेष्ठींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे, तर आज बुधवारी भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी नव्या सरकारचा मुख्यमंत्रीपदाचा आणि इतर मंत्र्याच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची चर्चाही सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात काही जुन्या चेहर्‍यांना डच्चू देऊन नवीन चेहर्‍यांना संधी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह मंत्रिपदासाठी इच्छुक नव्या उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. काही आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे धाव घेतली आहे.

विधिमंडळाची बैठक लांबणीवर
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या बंगल्यावर मंगळवारी दुपारी 2 वाजता एक बैठक होणार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता होती. या बैठकीत मंत्रालयांबाबत निर्णय घेतला जाणार होता. मात्र, शिंदे हे रुग्णालयात दाखल झाल्याने ही बैठक लांबणीवर पडली होती. सायंकाळी 5 वाजता शिंदे वर्षा बंगल्यावर हजर झाल्याने ही बैठक लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुतीच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला
महायुतीच्या सरकारच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. महायुती सरकारचा पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये भाजपकडे 21 ते 22 मंत्रिपदे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रिपद भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद देखील भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदावर त्यानंतर चर्चा होणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीच्या दिवशी एकनाथ शिंदे गटाचे 11 ते 12 मंत्री असण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाचे 10 मंत्री असण्याची शक्यता आहे.

COMMENTS