मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येवून ठेपला असतांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती मंगळवारी पुन्हा एकदा बिघड
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येवून ठेपला असतांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती मंगळवारी पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे अनेक चाचण्या झाल्यानंतर सायंकाळी एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यामुळे महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, चेकअपसाठी आलो होतो आणि आता प्रकृती उत्तम आहे. ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे समोर आले. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आपला ताफा घेऊन मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना झाले. याठिकाणी ते बैठका घेणार की नाही, याबाबत मात्र अद्याप समजू शकलेले नाही. एकनाथ शिंदे 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांना 105 डिग्री ताप आला होता. त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढर्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणार्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांची तब्बेत बरी नसल्याने ते कुठेही बाहेर पडत नाहीयेत. तर दुसरीकडे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
COMMENTS