Homeताज्या बातम्याशहरं

पाटील कुटुंबियांकडून वनविभागास दोन एकर जमीन दान

सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबियाचा उपक्रमशिराळा / प्रतिनिधी : अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पा

माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली
अंनिसच्या अध्यक्षपदी सरोजाताई पाटील
विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू

सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबियाचा उपक्रम
शिराळा / प्रतिनिधी : अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील हे सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. ते राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्यांनी सदैव उत्साहाने सहभाग नोंदवला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणी व जडणघडण विकासासाठी संवर्धनाच्या कार्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत सुरू असणार्‍या निसर्ग पर्यटन विकासामध्ये योगदान देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. सदर इच्छेच्या अनुषंगाने त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी श्रीमती सुरेखा पाटील, कन्या सौ. रत्नप्रभा व सौ. गौरी यांच्यासह सर्व कुटुंबियांनी विचार विनिमय करून कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्वमालकीची मौजे पानेरी, ता. पाटण, जि. सातारा, येथील दोन एकर जमीन बक्षीस पत्राद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यांचे नावे करून दिली. यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान कोल्हापूरतर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प देबेवाडी यांनी बक्षीस पत्रावर स्वाक्षरी केली. या जागेवर त्यांचे नावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कडून निसर्ग पर्यटन संकुल उभारण्याचे नियोजित आहे.
कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. कलेमेंट बेन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्‍चिम प्रदेश मुंबई तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजन यांनी त्यांचे आभार मानले. तद्नंतर त्यांचे सर्व कुटुंबियांच्या सह्याद्री व्याघ्र राखीवच्या वतीने उपसंचालक कोयना व उपसंचालक चांदोली यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून ऋण व्यक्त केले. यावेळी वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यामध्ये रोहन भाटे व नाना खामकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
चौकट –
कै. पापा पाटील यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास पाच दशके पश्‍चिम महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी वाहून घेतली होती. त्यांनी बत्तीशिराल जिवंत नागपंचमीच्या प्रदर्शनाबाबत जनहित याचिका दाखल केली होती आणि बत्तीशिराला येथे बेकायदेशीर जिवंत सर्प प्रदर्शन थांबवले होते. तसेच त्यांनी चांदोली भागातील बेकायदेशीर बॉक्साईट खाणकाम विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. ते सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. तसेच महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत. सह्याद्रीतील प्रमुख औषधी नारक्या, सप्तरंगी या सारख्या वनस्पतीची अवैध तसेच चोरटी तोड उघडकीस आणण्यात तसेच रोखण्यात फार मोठा वाटा होता.

COMMENTS