Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ रथोत्सव उत्साहात

म्हसवड / वार्ताहर : ‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’ नाथाच्या घोड्याचे चांगभलं चांगभलं बोला चांगभलं जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दन

महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी देण्याबाबत निर्णय घेऊ : मंत्री अतुल सावे
बीड शहरात एकलव्य भिल्ल समाज संघटनेची मोटारसायकल रॅली

म्हसवड / वार्ताहर : ‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’ नाथाच्या घोड्याचे चांगभलं चांगभलं बोला चांगभलं जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण करत रथोत्सव मोठ्या उत्साहात झाला.
महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणार्‍या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी महेश गुरव बुरंगे यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये दुपारी तीनच्या सुमारास बसवण्यात आल्या. यावेळी मानाच्या सासन काठ्यांची भेट झाल्यावर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून श्रीमंत अजितराव राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, विश्‍वजित राजेमाने तसेच माजी कोकण आयुक्ती प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आश्‍विनी शेंडगे, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि सखाराम बिराजदार यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह दिवशी श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्‍वरी यांचा विवाह सोहळा होवून आज सोमवारी रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव मोठ्या उत्साहात झाला.
दुपारी तीन वाजनेच्या सुमारास श्रींचा रथ नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. यावेळी भाविकांनी सिध्दनाथाच्या नावाने चांगभलं च्या गजरात रथावर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. तसेच अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून यावर्षी माण नदीच्या पात्रात पाणी असल्याने रथ नदीपात्रातून न जाता बायपास रोड ने सातारा-पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्‍यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.

COMMENTS