मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार येवूनही एक आठवड्याचा कालावधी उलटला तरीही मुख्यमंत्री कोण होणार आणि शपथविधी कधी होणार याचा सस्पेन्स संपलेला नाही.
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार येवूनही एक आठवड्याचा कालावधी उलटला तरीही मुख्यमंत्री कोण होणार आणि शपथविधी कधी होणार याचा सस्पेन्स संपलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले असून, महायुती सरकारचा शपथविधी गुरूवार 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महायुतीची शनिवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी परतल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भाजपच्या नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रीपद अशा दोन पदाच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. त्यावर दोन दिवसांत शिंदे निर्णय कळवणार असल्याचे समजते. त्यानंतर महायुतीची बैठक होणार असून, या बैठकीत मंत्रिपद आणि खात्यांची अंतिम विभागणी करून शपथविधीची पुढील तयारी केली जाईल असे बोलले जात आहे. फडणवीस यांचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.
COMMENTS