Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहशतवादी हल्ल्यातील पोलिस हुतात्मांना अभिवादन

मुंबई : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या

बीडमध्ये जमिनीच्या वादातून दिवसाढवळ्या गोळीबार
दिल्लीत खासगी बाईकचा टॅक्सी म्हणून वापर करण्यास बंदी
महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही

मुंबई : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी हुतात्म्य पोलिस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
16 व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलिस स्मारक येथे शहीद पोलिस अधिकारी आणि जवानांना पोलिस दलामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली. पोलिस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ तसेच ‘बिगुलर्स लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी पोलिस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले. राज्यपालांनी हुतात्मा पोलिस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची भेट घेतली. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

COMMENTS