नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत नोंदवली असून, अनेकांना श्वास घेणे देखील कठीण जातांना दिसून येत आहे. हवेची गुणवत्तेने ध
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत नोंदवली असून, अनेकांना श्वास घेणे देखील कठीण जातांना दिसून येत आहे. हवेची गुणवत्तेने धोकादायक पातळी गाठल्यानंतर येथील 39 प्रदूषण निरीक्षण केंद्रांपैकी 32 ने वायु गुणवत्ता निर्देशांक गंभीर असल्याचे घोषित केले आहे. या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पाचवीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिकवण्यात येणार आहे.
दिल्ली शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे पुढील सूचना येईपर्यंत दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळांचे ऑनलाइन वर्गात रूपांतर करण्यात येणार आहे. या शाळांमधील मुलांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेता येणार आहे.
COMMENTS