शासनाने यंदाचा पालखी सोहळा जैव सुरक्षा कवच पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी : नितीन महाराज मोरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाने यंदाचा पालखी सोहळा जैव सुरक्षा कवच पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी : नितीन महाराज मोरे

शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी.

मणिपुर प्रकरणात भाजपाचा खरा चेहरा जगासमोर आला-राजेसाहेब देशमुख
*सिरम नंतर आता ‘हा’ लस उत्पादक पुण्यात दाखल | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

पुणे : शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे. यावेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरया आणि विश्वस्त उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. 

    या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. बायोबबल म्हणजे काय? जैव सुरक्षित वातावरण ( बायोबबल ) यामध्ये संबंधित व्यक्तींना आरोग्याचा अहवाल रोज सादर करावा लागतो. समाज, परिसर आणि नागरिकांपासून त्यांना १,२ किलोमीटर वेगळे ठेवले जाते. बायोबबलमध्ये त्यांना कोणीही व्यक्ती भेटू शकत नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाते.

COMMENTS