Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोदय कारखाना सभासदांच्या मालकीचा करणार : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्व. आप्पांना व तुम्हा सभासदांना झालेला त्रास व यातनांची मला कल्पना आहे. त्या यातनाची परतफेड करण्याची आता योग्य वेळ आली

औंधची पोलीस वसाहत फळा-फुलांनी बहरणार ; पोलीस वसाहतीत 100 झाडांची लागवड
शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत
पोपट कुंभार बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मनीत

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्व. आप्पांना व तुम्हा सभासदांना झालेला त्रास व यातनांची मला कल्पना आहे. त्या यातनाची परतफेड करण्याची आता योग्य वेळ आली आहे. निवडणुकीत तुम्ही परिवर्तन घडवा. मी तुम्हाला शब्द देतो की, त्यानंतर सर्वोदय कारखाना सभासदांच्या मालकीचा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागली तर मी ती मोजायला तयार आहे, असे आश्‍वासन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी दिले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील कारंदवाडी, तुंग, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी भीमराव माने, सागर खोत, प्रसाद पाटील, केदार पाटील, निवास पाटील प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, तुंग व कारंदवाडी ही गावे एका वेगळ्या विचारांची आहेत. ज्या कारंदवाडीत स्व. वसंतदादांनी पाणी पुरवठा योजना आणून शेती हिरवीगार केली. इथल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा फोटो नसणे, हे दुर्देवी आहे. सुरेश कबाडे सारखे संशोधक त्यांचे पाहुणे नसल्याने विरोधकांनी यांच्या कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून घेतले नाहीत. ऊसाला चांगला दर मिळावा व काट्यात मारामारी होऊ नये म्हणून ऊस उत्पादक म्हणून तुम्ही आता जागरूक होण्याची गरज आहे. गेल्या 35 वर्षाचा तुमच्या उसाच्या बिलाचा हिशोब काढा. तुमच्या कष्टाचे पैसे कोणाच्या घशात गेलेत, याचा विचार करा. माळेगावच्या कारखान्याची रिकव्हरी कमी असून ही 3636 रुपये दर द्यायला परवडतो. मग येथील रिकव्हरी जास्त असून ही विरोधकांना दर का द्यायला परवडत नाही. कसबे डिग्रज व मौजे डिग्रज ही पराक्रम व शौर्याचा वारसा असणारी गावे आहेत. गेल्या 35 वर्षात माझ्या विरोधात निवडणूक लढवणारा पुढल्या निवडणुकीला माझ्या व्यासपिठावर असतो, असा गैरसमज असणार्‍या विचारा विरोधात माझी लढाई आहे. सन 2009 मध्ये तुमची गावे इस्लामपूर मतदार संघात आली. त्यानंतर आमदारांना तुम्ही मताधिक्य दिले. गेल्या 15 वर्षात त्यांना गावचे रस्ते करता आले नाहीत. स्व. संभाजी पवार व स्व. मदन पाटील यांनी केलेले रस्ते आजही आहेत. ते दोघेही आज हयात असते तर मला तुम्हा पुढे यायची गरज भासली नसती. ज्यांना तुंगाच्या पुढे कोण ओळखत न्हवते, त्यांना आप्पांनी सांगलीत आणून ओळख निर्माण करून दिली. आप्पांनी उभा केलेला कारखाना यांनी घशात घातला. स्व. वसंतदादांच्या घराण्याला ही ते राजकीय दृष्ट्या त्रास देत आले आहेत. स्व. पतंगराव कदम, स्व. आर. आर. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना त्रास दिला. त्यामुळे या प्रवृत्तीला धडा शिवण्यासाठी मला मताधिक्य देऊन परिवर्तन घडवा.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS