Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात आज प्रवेश

इस्लामपूर: बोलताना माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मनीषा पाटील, मानसिंग पाटील, संजय भोईटे. इस्लामपूर मतदार संघात परिवर्तन घडवणार : जयवंत पाटीलइस्

प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
’टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर पायी प्रवास

इस्लामपूर मतदार संघात परिवर्तन घडवणार : जयवंत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : गेले 30 वर्षे सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सोडून राष्ट्रवादी अजित पवार पवार गटामध्ये आज प्रवेश करणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
या बैठकीला माजी बांधकाम सभापती मनीषा पाटील, मानसिंग पाटील, भाजप शहर युवक अध्यक्ष सतीश पाटील, युवा नेते सुरज पाटील, संजय भोईटे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष तेजस्विनी पाटील, शिवराज जाधव उपस्थित होते.
जयवंत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागतही झाले आहेत. आष्ट्यात निशिकांत पाटील यांच्या प्रचार सभेत आम्ही जाहीर प्रवेश करणार आहे. आमची कोणतीही संस्था नाही. कार्यकर्ता हीच आमची संस्था आहे. आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही इथपर्यंत आलो आहे. गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पत्रकार परिषदेला संगीता भोईटे, महेंद्र बेलवलकर, अमर जमादार, अमित माने, मनोज ओसवाल, बाबुराव शेजवळे उपस्थित होते.

COMMENTS