Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवसाय आणि इतर सर्व कर्मचार्‍यांना सुट्ट

दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी सदैव तत्पर ः आ. आशुतोष काळे
कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी दिशा दर्शक ठरेलः मुख्यमंत्री शिंदे
वाळू भरून जाणार्‍या हायवे टिप्परवर धाडसी पोलिसांची कारवाई

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवसाय आणि इतर सर्व कर्मचार्‍यांना सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे निर्देश मुंबई जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी दिले आहेत. तसेच या निर्देशाचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने गगराणी यांनी येथे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. मुंबईतील सर्व कर्मचार्‍यांना 20 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी पगारी सुट्टी द्यावी आणि हा नियम सर्व औद्योगिक क्षेत्रे, महामंडळे, कंपन्या आणि इतर आस्थापनांना लागू होईल. ‘सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन्स, उपक्रम संस्था, औद्योगिक गट, व्यापारी इतर सर्व आस्थापने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार नोव्हेंबर 2024 रोजी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना रजा देणे बंधनकारक आहे,’ असे महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS