Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेत असताना पेठ-सांगली रस्त्याचा दुसर्‍याला दोष का? : आ. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या 10 वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसर्‍याला दोष कसा देता? असा

शिराळा न्यायालयाकडून पुन्हा राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट; शिरीष पारकरांना जामीन
कराड पालिका ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात कचरा गाड्या उभ्या
परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या 10 वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसर्‍याला दोष कसा देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांनी तुंग येथील प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केला.
हा मतदार संघ तुमच्या हवाली करून मी आजपासून राज्याच्या प्रचार दौर्‍यावर जात आहे. प्रत्येकाने आपले गांव, बूथ सांभाळा, विजय आपलाच आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी श्री हनुमानाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आ. पाटील म्हणाले, मी एकदा विना टोल पेठ-सांगली रस्त्याचे चौपदरीकर-तीन पदरीकरण केले होते. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी हा रस्ता केंद्राकडे वर्ग केला. त्यामुळे आपले सन 2019 ला काही वर्षे सरकार आल्यानंतर हा रस्ता करता आला नाही. मी स्वतः केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या रस्त्याची मागणी केली आणि पाठपुरावा केला आहे. भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. हे राज्य वाचवण्यासाठी भाजपा महायुतीस सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा.
याप्रसंगी दिलीपतात्या पाटील, वैभव शिंदे, बी. जी. पाटील, अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे, भास्करराव पाटील, बी. के. पाटील, शहाजीबापू पाटील, अ‍ॅड. आर. आर. पाटील, वैभव पाटील, कविता पाटील, एस. के. पाटील, सचिन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी धनाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आपुगडे, संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, अभिजित चोरमुले, तेजस्विनी बोंडे, सुरगोंड पाटील, महावीर चव्हाण, माणिक पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप कुडचीकर यांनी आभार मानले.

COMMENTS