Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी हळदी समारंभ मोठ्या उत्साहात

म्हसवड / वार्ताहर : श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या शाही मंगल विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेन

कराड मंडई परिसरात राडा; तलवार हल्ल्यात एक गंभीर
सातारा पालिकेचा दणका; बड्या थकबाकीदारांकडून कोट्यवधी वसूल
लवकरच राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांचे 142 महिलांच्या हाती स्टेअरिंग

म्हसवड / वार्ताहर : श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या शाही मंगल विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेने करण्यात आला. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूंच्या उत्सवमूर्तींना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात झाला.
आता तुलसी विवाहादिवशी म्हणजे बुधवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा होणार आहे.
शनिवार, दि. 2 नोव्हेंंबर रोजी दिवाळी पाडव्या दिवशी सकाळी 10 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात एका छोटेखानी दिवानावर श्रींच्या पंचधातूंच्या ऊत्सवमूर्ती स्थानापन्न करण्यात आल्या. परंपरागत प्रथेनुसार सालकरीणबाई सौ. राणी गुरव यांच्या हस्ते सर्वप्रथम श्रींना हळदी लावण्यात आल्या. त्यानंतर गुरव समाजातील, शहरातील व परगावहून आलेल्या हजारो महिलांनी श्रींना हळदी लावल्या. यावेळी महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. ढोल, ताशा, सनई-चौघडा आदी मंगल वाद्यांच्या गजरात, चार तासानंतर हा हळदी समारंभ मोठ्या थाटात झाला. त्यानंतर श्रींच्या मूर्तींना लिंबू, दही, दूध, तूप, पंचामृत व गरम उदकाने अभ्यंगस्नान घालण्यात आले. नंतर या मूर्ती मूळ ठिकाणी स्थानापन्न करण्यात आल्या.
दरम्यान, रविवारी, दि. 3 नोव्हेंबर, भाऊबिजेच्या संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचारती, धुपारती घेऊन सालकरी महेश गुरव, पुजारी मंडळी, ढाल, तलवार, श्रीनाथ मठातील रवीनाथ महाराज, या सर्व लावाजम्यासह ही आरती मिरवणूक परंपरागत चालत आलेल्या प्रथेनुसार श्रींची आरती घरासमोरुन जाणार असल्याने महिलांनी आपापल्या घरासमोर सडा टाकून त्यावर आकर्षक व रेखीव, मनाला आकर्षित करणार्‍या रांगोळ्या काढल्या होत्या. आपल्या घरासमोर श्रींची आरती मिरवणूक जास्तीत-जास्त वेळ थांबावी म्हणून पारंपारिक प्रथेनुसार प्रत्येक घरातील सुवासिनींनी आरती घेतलेल्या सालकर्‍यांना औक्षण करून ओवाळले. घरातील सर्वांनी श्रींचे आशिर्वाद घेतले. त्याबरोबरच प्रत्येकाने ईर्षेने व स्पर्धेने फटाक्यांची मनसोक्त आतिषबाजी करण्यात आली. यालाच दिवाळी मैदान असे म्हणतात. यावेळी दिवाळी मैदान पहाणारांचे डोळे अक्षरश: दीपून गेले.

COMMENTS