Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरातील माघार : दोन मराठा नेत्यांमधील तीव्र अंतर्विरोधाचा परिणाम!

  कोल्हापूर ही शाहू महाराजांचा इतिहास असलेली नगरी! ज्यांनी, आरक्षणाला कृतीशील जन्म या नगरीतून दिला. सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाची प्रमाण

बिहारमध्ये ओबीसी ‘सब पे भारी!’
 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केले स्वागत
शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – आमदार राजळे

  कोल्हापूर ही शाहू महाराजांचा इतिहास असलेली नगरी! ज्यांनी, आरक्षणाला कृतीशील जन्म या नगरीतून दिला. सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाची प्रमाण असलेल्या या नगरीत काल अजब घटना घडली. जी कोल्हापूर च्या अर्वाचीन राजकीय इतिहासात प्रथमच घडली! झालं असं की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शाहू महाराजांच्या राजघराण्यातील मधुरिमा राजे यांनी शेवटच्या पाच मिनिटांत आपली उमेदवारी मागे घेतली. वर्तमान शाहू महाराज यांच्या स्नुषा असलेल्या मधुरिमा राजे या खरंतर, काॅंग्रेसच्या मुळ उमेदवार नव्हत्या. सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांना याठिकाणी काॅंग्रेसची उमेदवारी दिली होती. परंतु, उमेदवारी दिल्यापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात लाटकर यांच्या विरोधात कोल्हापूर नगरपालिकेच्या काॅंग्रेसचे माजी २८ नगरसेवकांनी असहकार पुकारला. त्यामुळे, उमेदवार बदलण्यासाठी दबाव वाढला. लाटकर यांना अजित पवार यांचा माणूस मानला जात असल्याने त्यांच्या उमेदवारीला येथे विरोध झाला. त्यातून, वर्तमान शाहू महाराज आणि काॅंग्रेसचे लोकसभा खासदार यांच्या सून मधुरिमा राजे यांना तिकीट देण्याचे निश्चित झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणाला मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, काल, उमेदवारी अर्ज देखील त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुळात मधुरिमा राजे यांची उमेदवारी दाखल करणे आणि माघार घेणे या दोन्ही प्रक्रिया मराठा नेत्यांमधील आपसातील अंतर्विरोधाचा भाग आहे. वर्तमान शाहू महाराज आणि सतेज पाटील याचे काॅंग्रेसमध्ये असूनही सूर जुळत नाही.‌ 

       मधुरिमा राजे या महाराष्ट्राचे माजी मंत्री असलेल्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या. असं म्हटलं जातं की, खानविलकर यांचा पराभव होण्यात सतेज पाटील यांचा हात होता. त्यामुळे, मधुरिमा राजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून राजेश लाटकर या काॅंग्रेसच्या मुळ उमेदवाराची माघार होणे गरजेचे होते. परंतु, लाटकर हे माघारीच्या एक दिवस आधीच नाॅट रिचेबल झाल्याने शाहू महाराज यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, रात नवल ते काय! राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याने राजे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या होत्या. परंतु, मतदार संघातील पर्यायी उमेदवाराची माघार न झाल्याने अगदी शेवटच्या क्षणी माघार घेत कोल्हापूर च्या राजकारणाला शाहू महाराजांनी धक्का दिला.‌ मधुरिमा राजे यांच्या माघारीने सतेज पाटील संतापले.‌ परंतु, राजकारणात सर्वच स्मार्ट असतात याची जाणीव कदाचित सतेज पाटील यांना आली नसावी. 

त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा संताप पाहायला मिळाला. महाराज, तुम्ही हे बरोबर केलं नाहीत, मी तोंडघशी पडलो, अशा शब्दात बंटी पाटलांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर चीड व्यक्त केली. निवडणूक लढवायची नव्हती, तर आधी सांगायचं होतं, मीही माझी ताकद दाखवली असती, असंही सतेज पाटील म्हणाले.हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती? आधीच निर्णय घ्यायचा होता ना, नाही म्हणून. हे चुकीचं आहे महाराज. हे काय बरोबर नाही, हे मला मान्य नाही. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? अशा शब्दांत सतेज पाटील यांच व्यक्त होणं, म्हणजे दोन मराठा नेत्यांमधील अंतर्विरोध किती तीव्र आहे, याची प्रचिती येते.

COMMENTS