अहिल्यानगर : अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांची नुकतीच नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशन
अहिल्यानगर : अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांची नुकतीच नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया (NAPSWI) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या समाजकार्याची राष्ट्रीय संघटना नॅप्स्वीच्या नूतन कार्यकारणी निवडीसाठी नुकतीच निवडून प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्या अनुषगाने हरियानातील सोनीपत येथील भगत फुलसिंग महिला विद्यापीठात आयोजित भारतीय समाजकार्य परिषेदेत पठारे यांना बहुमताने विजयी घोषित करण्यात आले. या निवडीमुळे देशातील सामाजिक कार्य क्षेत्रासाठी नवी दिशा निश्चित केली जाईल, असे मानले जात आहे.
डॉ. सुरेश पठारे हे नॅप्स्वीचे संस्थापक सदस्य असून त्यांनी संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी सचिव म्हणून कार्य करत अनेक राष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यांनी समाजकार्य शिक्षण क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आणि समाजकार्याला व्यावसायिक स्वरूपात मान्यता मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. डॉ. पठारे यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्याच्या माध्यमातून सामाजिक समस्यांच्या प्रभावी सोडवणुकीसाठी विविध कार्यशाळा, परिषदा, आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकार्य व्यवसायाला समाजात अधिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्याची व्याप्ती वाढावी आणि अधिक युवकांना या क्षेत्रात आकर्षित करावे, यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे नॅप्स्वीची विचारधारा अधिक व्यापक होऊन देशभरातील समाजकार्य व्यावसायिकांना दिशानिर्देश मिळवून दिले जात आहेत.डॉ. पठारे यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड समाजकार्य शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट असून भारतातील समाजकार्य शिक्षणाला एक नवीन उंची मिळण्यास मदत होईल. त्यांच्या निवडीमुळे समाजकार्य शिक्षणाचे व्यापक आणि शैक्षणिक दृष्टिकोनास प्रोत्साहन मिळेल, तसेच अनेक नव्या धोरणांची आखणी होईल. विविध स्तरांतील समाजकार्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. डॉ. सुरेश पठारे यांच्या निवडीबद्दल सीएसआरडी संस्थेच्या प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांची ही निवड सीएसआरडीसाठीही गौरवाची बाब ठरली आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजकार्य क्षेत्रातील अनेकांनी डॉ. पठारे यांच्या कार्याला सन्मान दिला असून त्यांच्या पुढील कार्यकाळात समाजकार्य शिक्षणात सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
डॉ. पठारे यांचे अनुभव, ज्ञान, आणि सामाजिक कार्याविषयीची बांधिलकी यामुळे नॅप्स्वीच्या उद्दिष्टांना नवीन ऊर्जाशक्ती मिळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्य शिक्षणाला अधिक व्यापक आणि समाजाभिमुख दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.डॉ. पठारे यांच्या सोबत नॅप्स्वीच्या नूतन कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून नवी दिल्ली येथील जेष्ठ प्राध्यापक डॉ. संजय भट्ट, सचिव म्हणून लखनौ विद्यापीठातील डॉ. अनुप भारतीया, खजिनदार पदी नागपूर समाजकार्य महाविद्यालायचे येथील प्राध्यापक डॉ. केशव वाळके, सह सचिव म्हणून पॉन्डिचेरी विद्यापीठातील डॉ. नलिनी रंगनाथन तर कार्यकारणी सदस्य म्हणून अनुक्रमे नागालँड येथील पीस सेंटर व नॉर्थ ईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अॅन्ड रिसर्चचे फ्रादर सी.पी. अॅन्टो, हरियाना येथील बीपीएस महिला विद्यापीठाच्या डॉ. मंजू पनवार, दिल्ली येथील नाडा या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणारे सुनील वात्सायन, ओडीसा येथील सेंच्युरियन विद्यापीठाचे डॉ. प्रदीप कुमार साहो, चंडीगड येथील पंजाब विद्यापीठाचे डॉ.गौरव गौर व केरळ येथील डॉ. के.आर. अनिश आदी मान्यवर निवडून आले आहेत
COMMENTS