Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला व मुलींसाठी  ‘एक पणती लोकशाहीसाठी’ छायाचित्र स्पर्धा

अहिल्यानगर :   जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी 'दिवाळीनिमित्त महिला व मुलींसाठी ‘एक प

शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर
तुकाई’ प्रकल्प प्रलंबित ठेवणार्‍यांवर कारवाई होणार !
वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार – आ. आशुतोष काळे

अहिल्यानगर :   जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ‘दिवाळीनिमित्त महिला व मुलींसाठी ‘एक पणती लोकशाहीसाठी’ या रांगोळीमध्ये पणती लावतानाच्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील महिला व मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दीपावली पर्वातील वसुबारस, धनत्रयोदशी ,नरक चतुर्दशी, दीपावली, पाडवा आणि भाऊबीज या  दिवशी उत्सव साजरा करतांना घर, कार्यालये, दुकाने इत्यादी ठिकाणी रेखाटलेल्या रांगोळ्यांना विशेष महत्त्व आहे. घरासमोर काढलेल्या रांगोळ्यांमध्ये महिला-मुलींच्या माध्यमातून आवर्जून आकर्षक दिवे ,पणत्या लावल्या जातात.लोकशाही प्रक्रियेमध्येदेखील महिलांचे मतदानातून विशेष योगदान आहे. या दोन्ही महत्वाच्या पैलूंना जोडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत महिला व मुली असे दोन गट असून स्वतःच्या संकल्पनेतील रांगोळीमध्ये “अहिल्यानगरकरांनो, तुम्ही लोकशाहीची पणती हाती धरा, विधानसभेच्या निवडणुकीत जरूर मतदान करा”, “आपले मतदान २० नोव्हेंबर रोजी आहे कृपया विसरू नका”, “अहिल्यानगरीच्या मतदार राजा जागा हो ! २० नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा धागा हो” यासारख्या संदेशांचे लेखन करावे.  महिला व मुलींनी रांगोळीत पणती ठेवताना किंवा रांगोळी काढताना  एक फोटो व रांगोळीचा फोटो असे दोन फोटो १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशातील पहिल्या अहिल्यानगर स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक असलेल्या ९००२१०९००३ या क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव, गट व पूर्ण पत्त्यासह पाठवायचे आहेत. उत्कृष्ट छायाचित्रांसाठी पारितोषिके देण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे, अशी माहिती स्वीप समन्वयक अधिकारी अशोक कडूस यांनी दिली आहे.

COMMENTS