Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर

मुंबई : संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे सांगितले जात असताना महाराष्ट्रात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर पाहायला मिळेल, असा अंदाज

कराड तालुक्यात वादळी वार्‍यामुळे नुकसान
वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी “या” करा उपाययोजना
नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कृष्णा कारखाना धावला..!

मुंबई : संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे सांगितले जात असताना महाराष्ट्रात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात आज नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशीही माहिती हवामान विभागाने दिली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्यापासून (19 ऑक्टोबर) पुढील तीन दिवस म्हणजे 21 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, नाशिक या भागात जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. दरम्यान, 22 ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे आणि 24 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा हवामान तज्ज्ञ करत आहेत.

COMMENTS