Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान !

एकाच टप्प्यात होणार विधानसभा निवडणूक ; निवडणूक आयोगाची घोषणा

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद

पुरोगामी चळवळीचा आधारवड
पुण्यात दहशतवाद्यांनी वापरलेली इमारत जप्त
टाकळीच्या विनोद निकोलेची महाराष्ट्र सिक्युरिटी पोलिस फोर्समध्ये निवड

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा घोषणा केली. यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच इतर राज्यातील विधानसभेच्या 48 आणि लोकसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूकही दोन टप्प्यात होणार आहे. 13 नोव्हेंबरला विधानसभेच्या 47 आणि लोकसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे. एक विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकालही लागणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गाताील 234 जागा आहेत. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा आहेत. तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यासाठी राज्यात 9 कोटी 63 लाख मतदार मतदान करतील. त्यासाठी महाराष्ट्रात 1 लाख 186 निवडणूक केंद्र असतील. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत. मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा असल्यामुळे मतदान त्रस्त होतात, मात्र आता मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रवर उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती आयुक्त राजीवकुमार यांनी दिली आहे. तसेच 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे 3 वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचे वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा फॉर्म भरावा लागणार आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अ‍ॅप जारी करण्यात आले आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.

एटीएमसाठी पैसे घेऊन जाणार्‍या वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणार्‍या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.

अशी असेल निवडणूक प्रक्रिया
निवडणुकीची अधिसूचना: 22 ऑक्टोबर
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

COMMENTS