Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी सिनेसृष्टीचा ’अतुल’नीय तारा निखळला

मुंबई :अभिनेते अतुल परचुरे यांचे मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. दादर येथील स्

भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली मी इलायची दिली – शंभुराज देसाई
नीरज चोप्राचे निर्भेळ यश
चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
Veteran Actor Atul Parchure Dies At 57

मुंबई :अभिनेते अतुल परचुरे यांचे मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. दादर येथील स्मशानभूमीत अतुल परचुरे यांचे अत्यंविधी पार पडले. अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण मराठी कलासृष्टी हजर होती. अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप कलाकारांना अश्रू अनावर झाले. अतुल परचुरे यांनी बजरबट्टू या नाटकातून बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तेव्हापासून रंगभूमीसोबत एक अतुलनीय असे नाते त्यांचे तयार झाले होते. त्यानंतर अनेक नाटके, मालिका, सिनेमे या माध्यमातून अतुल परचुरे यांनी प्रेक्षकांचे अगदी निखळ मनोरंजन केले. काही महिन्यांपासून अतुल परचुरे हे कर्करोगाशी झुंजत होते. यावर मात करण्याचा प्रयत्न ते करत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर कमबॅकचीही तयारी केली होती. पण रंगभूमीवरचा त्यांचा हा प्रवेश होण्याआधीच ते काळाच्या पडद्याआड गेले.
अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, संजय मोने, सुकन्या मोने, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, उमेश कामत, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री यांसह अनेक कलाकांनी हजेरी लावली. अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप देताना कलाकारांनाही अश्रू अनावर झाले होते. अतुल परचुरे यांच्या अंत्यसंस्काराला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.

COMMENTS