Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनता महायुतीचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही : वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची महायुतीवर टीका

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे. मात्र त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधक

संविधान भारतीय नागरिकांचा आत्मा : विजय झंजाड
श्री स्वामीचे अनुभव | श्री स्वामी समर्थ | Shri Swami Anubhav
LokNews24 l राज्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे. मात्र त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. निवडणूक जाहीर होण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहत होती. जनता त्रस्त झाली असून, महागाईने होरपळतेय, मात्र सरकार योजनांमध्ये गुंग असल्यामुळे जनता यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी केली.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, नवीन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाचे भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? 40 दिवसांचा कमीत कमी कालावधी असला पाहिजे. मात्र 35 दिवसात निवडणूक घेत आहेत. रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात आम्ही तक्रार केली होती. मात्र तळ राखेल तो पाणी चाखेल. जर तळ चाखायची जबाबदारी दिली असेल तर मग काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, निवडणूक जाहीर होण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहत होती. निवडणूक होत आहे याचा आनंद आहे. हरियाणात जिंकल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक होत आहे. नाही तर राष्ट्रपती राजवट लावली असती. महाराष्ट्र बुडवण्याचे काम करणार्‍यांना जनता बुजवण्याचे काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आम्हाला अनकुल परिस्थिती आहे. हे सरकार 30 टक्क्यांपर्यंत कमिशन घेत होते. मतदार यांना माफ करणार नाही. निवडणुकीत पैशाचा पाऊस पडेल. मात्र जनता बळी पडणार नाही. महाविकास आघाडीचे 222 जागांवर एकमत झाले आहे. दोन दिवसांनी पुन्हा बैठक होणार आहे. दिल्लीत उद्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे, त्यात निर्णय होईल. निवडणूक आधीच होणे अपेक्षित होते. मात्र, सरकार घाबरलेले होते. सरकारने लोकांना फसवणारे निर्णय घेतले. सरकारी पैशातून जाहिराती करुन त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. आजची जाहिरात आम्ही पाहिली. त्यात तेलगंणातील योजना बंद असून सरकारने जाहिरात दिली. फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

संविधानाच्या रक्षणासाठी ही निवडणूक महत्त्वाची
विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही आमच्याकडून संविधान हा मुद्दा असणार आहे, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. राज्यात महाविकास आघाडी जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील. देशाचे संविधान वाचवण्यासाठी राज्यातील निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

COMMENTS