Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या : मुंडे

मुंबई दि. 9 : राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्या

 उध्दव ठाकरेंनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे- मंत्री अब्दुल सत्तार 
अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच ठरणार
चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 

मुंबई दि. 9 : राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश झाला असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

राज्यातील अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी राबविण्यात येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत  लाभार्थी निवड निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा  ७/१२  दाखला व ८  अ उतारा, आधार कार्ड, आधार संलग्न बँक खाते .किमान 0.40 हे. ते कमाल ६.००  हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे. मात्र दुर्गम भागात 0.40 पेक्षा कमी जमीनधारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दारिद्र्य रेषेखालील  लाभार्थ्यांना कमाल ६.००  हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही.

दि. 1 आक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी /घटकांचे आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. घटक आणि अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे. नवीन विहीर यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये) 2,50,000/- नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 4,00,000/-. जुनी विहीर दुरुस्ती यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-नवीन अनुदान मर्यादा (रुपये)1,00,000/-‌. इनवेल बोअरींग यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये) 20,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 40,000/-. विद्यूत पंप संच यापूर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)20,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये)40,000/-. वीज जोडणी आकार यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)10,000/- नवीन अनुदान मर्यादा (रुपये)20,000/-. सोलर पंप (वीज जोडणी आकार व विद्यूत पंपसंच ऐवजी) यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)30,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-. शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)1,00,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये)2,00,000/-. ठिबक सिंचन संच यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये) 50,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 97,000/-. तुषार सिंचन संच यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)25,000/-, नवीन अनुदान मर्यादा (रुपये)47,000/-. डिझेल इंजिन नवीन अनुदान मर्यादा (रुपये)40,000/- एचडीपीई / पीव्हीसी पाईप नवीन अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-. यंत्रसामुग्री (बैलचलित / ट्रॅक्टर चलित अवजारे)नवीन अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-. परसबाग नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 5,000/-.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेत फक्त वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी विंधन विहीर रु. 50,000/- आर्थिक मर्यादेत मंजूर केली आहे.

क्षेत्रीयस्तरावर योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत करण्यात येते. योजनांतर्गत अर्ज स्विकृती, लाभार्थी निवडीपासून ते अनुदान अदा करणेपर्यंतची कार्यवाही महा-डीबीटी पोर्टलव्दारे सुरु आहे. योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS