Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी पुण्यात येणार होते. मात्र पावसाचे कारण देत त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौ

थोरात कारखान्याकडून हुमणी अळी नियंत्रण अभियान
निवडणूक रणनीतीकारांचे एक वास्तव !
विद्यार्थिनींकडून रोडरोमिओला चोप | LOKNews24

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी पुण्यात येणार होते. मात्र पावसाचे कारण देत त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौर्‍यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार होते. यासोबतच स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. मात्र  मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानांचा दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.  
परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्दा झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची विशाल सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र,कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचे समजते. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

COMMENTS